गुन्ह्यातील तपासणी सोबतच आता कोरोनाच्या निदानासाठी श्वानांची मदत

गुन्ह्यातील तपासणी सोबतच आता कोरोनाच्या निदानासाठी श्वानांची मदत

  • श्वानांचा वापर करून कोरोनाचे निदान करण्याचा देशातील पहिला प्रयोग भारतीय लष्कराकडून करण्यात आला आहे.
  • अगोदर एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी मदत घेत पण आता कोरोनाच्या निदानासाठीही श्वानांचा वापर केला जात आहे.
  • हा भारतीय लष्कराकडून कोरोनाच्या निदानासाठी केलेला हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
  • कोरोनाच्या चाचणीतील विलंब टाळून लवकर निदान करण्याचा हेतू आहे.
  • लष्करातील श्वान त्यांच्या घ्राणेंद्रियाच्या तीव्र क्षमतेमुळे ओळखले जातात.
  • दोन श्वानांना प्रशिक्षण दिले जात आहे.
  • त्यापैकी ‘कॉकर स्पॅनियल’ प्रजातीचा कॅस्पर हा दोन वर्षांचा व तमिळनाडूतील स्वदेशी प्रजातीचा ‘जया’ या एक वर्षीय श्वानाचा समावेश आहे.
  • त्याचबरोबर लॅब्रोडोर प्रजातीच्या आणखी आठ श्वानांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.
  • मीरतमधील श्वान प्रशिक्षण संस्थेने श्वान प्रशिक्षण ले. कर्नल सुरिंदर सैनी यांच्याकडून दिले जात आहे.

कसे दिले जाते प्रशिक्षण?

  • श्वानांना मानवी लघवी व घाम हुंगण्यास दिले जाते.
  • घामातून व लघवीतून बाहेर पडणाऱ्या विशिष्ट जैविक घटक (बायोमार्कर) ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • जर घामाचा व लघवीचा नमुना पॉझिटिव्ह असल्यास त्यापुढे बसण्याचे व निगेटिव्ह असल्यास पुढे चालत जाण्याचे प्रशिक्षण श्वानांना दिले जात आहे.
  • दिल्ली कॉन्टोन्टमेंटमधील लष्करी पशुवैद्यकीय रुग्णालयात या श्वानांचे प्रात्याक्षिक घेण्यात येणार आहे.

Contact Us

    Enquire Now