गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब

 

गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब

जन्म : १० ऑगस्ट १९२६

ठिकाण : पिंपरी, ता. मोहोळ जि. सोलापूर

निधन : ३० जुलै (वयाच्या ९५व्या वर्षी)

ठिकाण : सोलापूर

ओळख :

 

  • शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते
  • महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू
  • एस. टी. ने प्रवास करणारा आमदार
  • विशेष – एकाच पक्षाकडून आणि एकाच मतदारसंघातून ११ वेळा आमदार
  • विक्रम – एकाच मतदार संघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षांचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता.

 

राजकीय कारकीर्द

 

  • आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख “सांगोला” मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
  • या कारणास्तव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सर्वात आगळावेगळा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.
  • आबासाहेब महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल ५२ वर्षे राहिले आहेत.
  • पन्नास वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत आबासाहेब यांनी दोन वेळा मंत्री म्हणून कार्य केले आहे.

 

आमदार म्हणून

 

  • १५ मार्च १९६२ – सांगोला मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवड
  • १९६२ ते २०१४ – सबंध काळात एकूण ११ वेळा आमदार
  • १९७२ आणि १९९५ – केवळ दोनदा पराभव झाला.
  • १९७२ काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी पराभव केला.
  • १९९५ – शहाजीबापू पाटील यांनी पराभव केला.
  • २००९ – विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून द्र. मु. क. पक्षाचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम आबासाहेबांनी मोडीत काढला.
  • २०१२ – आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण या निमित्ताने सभागृहासह महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा गौरव केला.
  • २०१९ – प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणातून निवृत्ती घेतली.
  • १९९०, २००४ आणि २००९ – महाराष्ट्र विधानसभेचे ‘हंगामी अध्यक्ष’ म्हणून कार्य पार पाडले.

 

आबासाहेब मंत्री म्हणून 

 

  • दोन वेळा मंत्री म्हणून कार्य पाहिले.
  • १९७८ ते १९८० – कृषी, ग्रामविकास व न्याय खात्याचे मंत्री मुख्यमंत्री – शरद पवार यांच्या सरकारमध्ये
  • १९९९ ते २००२ – पणन, रोजगार व हमी खात्याचे मंत्री मुख्यमंत्री – विलासराव देशमुख सरकार
  • मनोहर जोशी व नारायण राणे यांचा अपवाद वगळता यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस सर्व मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला.

Contact Us

    Enquire Now