गगनयान अभियान

गगनयान अभियान

  • नुकतेच मानवी गगनयान मोहीम २०२३मध्ये प्रक्षेपित केली जाईल असे केंद्रीय अणुऊर्जा आणि अवकाशमंत्र्यांनी सांगितले.
  • देशाचे पहिले अवकाश स्थानक २०३० पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

मिशन गगनयान :

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ची मानवी अवकाश मोहीम
  • २०१८च्या स्वातंत्र्यदिनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२२ पर्यंत भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठवण्याची घोषणा केली होती.
  • डिसेंबर २०१८ मध्ये भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेस मंजुरी देण्यात आली.
  • गगन अभियानामध्ये तीन प्रक्षेपणे केल्या जातील.
  • पहिल्या दोन चाचण्यांमध्ये मानव नसेल. पहिली चाचणी २०२२ वर्षाच्या उत्तरार्धात केली जाणार असून त्यामध्ये अवकाश यानाची तपासणी केली जाईल.
  • दुसऱ्या चाचणीमध्ये ‘व्योममित्रा’ नावाचे रोबोट पाठवल्या जाणार आहे.
  • तर २०२३ मध्ये होणाऱ्या तिसऱ्या प्रक्षेपणामध्ये तीन भारतीय अंतराळवीरांना (ज्यामध्ये एका महिलेचा समावेश असेल) पृथ्वीपासून ३०० ते ४०० किलोमीटर्स उंचीवर पाच ते सात दिवसांसाठी निम्न पृथ्वी कक्षेमध्ये (LEO) ठेवले जाईल.
  • असे केल्यास भारत स्वबळावर अवकाशात मानव पाठवणारा रशिया, अमेरिका आणि चीननंतर चौथा देश असेल.
  • गगनयान अवकाशात पाठवण्यासाठी जीएसएलव्ही एमके-३ हे प्रक्षेपक वाहन वापरण्यात येणार आहे.
  • निवडण्यात आलेल्या भारतीय अंतराळवीरांचे रशिया येथे प्रशिक्षण सुरू झाले आहे. तसेच अंतराळवीरांच्या वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी फ्रान्स मदत करणार आहे.
  • गगनयान मोहिमेचे प्रकल्प संचालक : आर. हटन
  • गगनयान तसेच भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी सर्व गरजा भागवण्यासाठी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात चल्लाकेरे येथे ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर उभारण्यात येत आहे.

आगामी इतर अभियाने : 

  • शुक्रयान : शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी भारताची पहिली मोहीम
  • आदित्य एल-१ : सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यासाठीचे भारताचे पहिले सौर मिशन

Contact Us

    Enquire Now