कोरोना महामारीमुळे १२ कोटी बालके दारिद्य्ररेषेखाली जाणार : UNICEF

कोरोना महामारीमुळे १२ कोटी बालके दारिद्य्ररेषेखाली जाणार : UNICEF

  • जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आशियाई देशांमध्ये १२ कोटी अधिक बालके दारिद्य्र रेषेखाली जाणार असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.
  • हा अहवाल अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका या आठ राष्ट्रांसंदर्भात भाष्य करतो. तसेच बालकांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वीज आणि इंटरनेटसारख्या सुविधांचीही अहवालात दखल घेण्यात आलेली आहे.
  • श्रीलंका, बांगलादेश यांसारख्या देशातील कुटुंबांनी कोरोना महामारीत अन्नधान्यावरील खर्च ३०% कमी केल्याचेही आढळून आले आहे. वर नमूद केलेल्या आठ राष्ट्रांमधील १०० कोटींपेक्षा जास्त लोक अन्न असुरक्षिततेमध्ये जगत आहेत.

UNICEF बद्दल :

  • युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रसंघटनेची बालविकासासाठी काम करणारी संस्था असून तिचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. विविध राष्ट्रांच्या शासनाबरोबर युनिसेफ कार्यक्रम आखत असते. बालकांच्या स्थितीवर अहवाल बनवून त्या देशाच्या केंद्रशासनाला मार्गदर्शन करण्याचे काम युनिसेफ करते.

Contact Us

    Enquire Now