कोरोनाचा पर्यटन क्षेत्रावरील आर्थिक परिणाम

कोरोनाचा पर्यटन क्षेत्रावरील आर्थिक परिणाम

  • जगभरातील पर्यटन अर्थव्यवस्थेला कोरोना काळातील चार महिन्यांच्या लोकडाऊनमुळे १.२ ट्रिलियन डॉलरचा फटका बसू शकतो, असे UNCTAD ने त्यांच्या COVID-19 and Tourism : Assessing the Economic Consequences या अहवालात म्हटले आहे.

अहवालातील निरीक्षणे :

१) सद्य परिस्थिती जर पुढील आठ महिन्यांसाठी स्थिर राहिली तर जगभरातील पर्यटन क्षेत्राला $२.२ ट्रिलियनचा फटका बसेल. यामुळे जागतिक स्थूल उत्पन्न देखील २.८% ने कमी होईल.

२) पर्यटन क्षेत्रातील प्रत्येकी $१ दशलक्ष तोटा हा देशांचे राष्ट्रीय उत्पन्न $२-३ दशलक्षने कमी करेल.

३) जमाईका, थायलंड या पर्यटन क्षेत्रावर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थांचे राष्ट्रीय स्थूल उत्पन्न अनुक्रमे ११% व ९% ने कमी होईल.

४) हॉटेल, रिसॉर्ट, मनोरंजनाची साधने, पर्यटकांसाठीचे साहसी खेळ या सर्वच जोड धंद्यांवर कोरोना लॉकडाऊनचा परिणाम होईल.

५) पर्यटन क्षेत्रात एकूण नोकर्‍यांपैकी ५४% नोकर्‍या महिला वर्गाकडे आहेत. या नोकर्‍या जाण्याची भीतीही उद्भवते.

६) काही विकसनशील देशांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २०% पर्यंत वाढू शकते.

UNCTAD बद्दल :

  • मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड
  • सेक्रेटरी जनरल : मुखीसा कीतूयी

Contact Us

    Enquire Now