कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद ब्राझिलकडे

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद ब्राझिलकडे

  • अवघ्या तेरा दिवसांवर आलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद अर्जेंटिनाकडून ब्राझिलकडे देण्यात आले आहे.
  • अर्जेंटिनातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हे यजमानपद रद्द करण्यात आले. दक्षिण अमेरिका संघटनेने स्पर्धेचे नवे यजमानपद तातडीने जाहीर करून स्पर्धेची अनिश्चितता संपवली.
  • मूळ कार्यक्रमानुसार कोपा अमेरिका स्पर्धा १३ जून ते १० जुलै यादरम्यान अर्जेंटिना आणि कोलंबियात होणार होती.
  • काही दिवसांपूर्वी कोलंबियाने देशातील अशांत परिस्थितीमुळे स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केली, पण त्याचे यजमानपद रद्द करण्यात आले. आता अर्जेंटिनातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तेथेही स्पर्धा न घेण्याचा निर्णय झाला.
  • कोपा अमेरिका स्पर्धा घेण्यासाठी काही अन्य देशांचे प्रस्ताव आले आहेत. त्याचा अभ्यास करून ब्राझिलमध्ये स्पर्धा घेण्याचे निश्चित केले.
  • कोपा अमेरिका संयोजनामुळे संघटनेची चार वर्षांपूर्वीची कमाई ११ कोटी ८० लाख डॉलर्स होती, तसेच स्पर्धा पात्र झाल्यास पात्र देशाची कमाई किमान ४० लाख डॉलर्स असेल.

Contact Us

    Enquire Now