केंद्राच्या योजनेतून महाराष्ट्राला १५७ पैकी फक्त दोनच रुग्णालये – महाविद्यालयास मंजुरी

केंद्राच्या योजनेतून महाराष्ट्राला १५७ पैकी फक्त दोनच रुग्णालये – महाविद्यालयास मंजुरी

  • जिल्हा रुग्णालये सक्षम करणे व त्या ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्याकरिता राबविल्या जाणाऱ्या केंद्राच्या योजनेतंर्गत महाराष्ट्राला १५७ पैकी फक्त दोनच रुग्णालये महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे.
  • जिल्हास्तरावरील रुग्णालयांना सक्षम करणे आणि डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन टप्प्यात योजना राबविली जात आहे.
  • या योजनेअंतर्गत उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या पाच राज्यांना मिळून ८७ महाविद्यालयास केंद्राने मंजुरी दिली आहे.
  • या उलट महाराष्ट्राने पाठविलेल्या ११ प्रस्तावापैकी केवळ दोनच रुग्णालये मंजूर झाल्याने फक्त २५० वैद्यकीय जागांची भर पडेल.
  • त्यामुळे देशात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात जिल्हास्तरीय रुग्णालय-महाविद्यालयाची गरज अधोरेखित करत ही योजना पुनरुज्जीवित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
  • दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राखालोखाल रुग्णसंख्या असलेल्या केरळमध्ये एकही रुग्णालय मंजूर करण्यात आले नाही.
  • या योजनेतून महाराष्ट्राला केवळ गोंदिया आणि नंदुरबार या दोनच ठिकाणी महाविद्यालय-रुग्णालय सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.
  • या योजनेअंतर्गत रुग्णालयाला येणाऱ्या खर्चापैकी ६० टक्के भार केंद्राकडून तर ४० टक्के राज्याकडून उचलला जातो.
राज्यांची नावे महाविद्यालय रुग्णालयाची संख्या (मंजूर झालेले)
उत्तरप्रदेश २७
राजस्थान २३
मध्यप्रदेश १४
तामिळनाडू, पश्चिम बंगाल ११
बिहार
ओरिसा, जम्मू-काश्मिर
छत्तीसगड, झारखंड, गुजरात, आसाम
उत्तराखंड, कर्नाटक
पंजाब, हिमाचलप्रदेश, आंध्रला
नागालँड
अंदमान-निकोबार, लडाख, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, हरियाणा प्रत्येकी १ रुग्णालय
महाराष्ट्र २ गोंदिया व नंदुरबार

Contact Us

    Enquire Now