कृत्रिम बुद्धिमत्ता

कृत्रिम बुद्धिमत्ता :

  • कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान जागतिक आर्थिक आणि तांत्रिक दृष्टिकोन तसेच आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूस आकार देणारे शक्तिशाली एजंट बनले आहे.

अ) आरोग्य सेवा: या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध अॅप्लिकेशन्स रुग्णांना निरोगी दिनचर्या व्यवस्थापित करून त्यांच्या वर्तणुकीचे स्वरूप तपासण्यास सहाय्य करतात, विविध रोगांच्या लक्षणांचे निरीक्षण करून प्राथमिक उपचारास मदत करतात.

  • रोबोटिक्ससारख्या तंत्रज्ञानामुळे अचूक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये डॉक्टरांना रोबोट सहाय्य करतात, तर पुनर्वसन केंद्रामध्ये सहायक तसेच मार्गदर्शक म्हणून रोबोट महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.

ब) संरक्षण: यामुळे खर्च व मनुष्यबळ कमी झाले आहे.

क) शिक्षण: या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी व शिक्षकास कमीत कमी वेळात अधिकाधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतात, स्किल मॅपिंगसारख्या पद्धतींमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अवघड वाटणाऱ्या भागावर अधिक भर देण्यास मदत मिळते.

ड) विमान सेवा: एआय ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनास प्रोत्साहन देते, ज्यामुळे त्यांना उत्कृष्ट उड्डाण अनुभव, तांत्रिक सहाय्य मिळते; तसेच वेळेवर माहिती उपलब्ध झाल्यामुळे प्रवासादरम्यान होणारा विलंब किंवा इतर समस्यांनाही तोंड द्यावे लागत नाही.

Contact Us

    Enquire Now