ऑक्सिजन एक्स्प्रेस

ऑक्सिजन एक्स्प्रेस

  • राज्यातील वैद्यकीय वापरासाठीच्या प्राणवायूचा तुटवडा भरून काढण्यासाठी रेल्वेमार्फत पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालवली जाणार आहे.
  • महाराष्ट्रासाठी १९ एप्रिल रोजी कळंबोली येथून विशाखापट्टणम्ला ही एक्सप्रेस रवाना झाली असून ११० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन परतणार.

वैशिष्ट्ये :

  • ‘रोल ऑन रोल ऑफ’ पद्धतीने रिकामे टँकर सपाट वॅगनवर चढवण्यात आले आहेत.
  • प्रत्येकी १६ मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर
  • लांबचा असला तरी व्यवहार्य असा सूरत-नंदूरबार-जळगाव-नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे.
  • सिग्नलचा कमीत कमी अडथळा येईल, अशा पद्धतीने ग्रीन कॉरिडोरची निर्मिती
  • टँकरची वैशिष्ट्ये : ३३२० एमएम उंची असलेले टी १६१८ मॉडेलचे १० टँकर
  • ग्रीन कॉरिडोर : मध्य रेल्वे – कळंबोली ते विशाखाट्टणम्, जमशेदपूर, रुरकेला आणि बोकारो

ग्रीन कॉरिडोर म्हणजे काय?

  • हा एक खास वाहतूक मार्ग असून ज्यामध्ये सिग्नल मॅन्युअल मोडद्वारे वापरले जातात आणि गरजेनुसार वाहतूक वळवतात.

रोल ऑन-रोल ऑफ (रो-रो) वाहतूक सेवा :

  • या सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील कोंडी कमी करण्यासाठी मदत
  • केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून ५०-५०% निधी रो-रो सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • भारतमाला प्रकल्पांतर्गत मुंबईला जोडणाऱ्या मार्गावर ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Contact Us

    Enquire Now