एफएटीएफच्या निकषांची पूर्तता न केल्याने पाकिस्तान करड्या यादीत कायम

एफएटीएफच्या निकषांची पूर्तता न केल्याने पाकिस्तान करड्या यादीत कायम

  • दहशतवाद्यांना मिळत असलेले आर्थिक पाठबळ रोखण्यात आणि आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी पाकिस्तानला अपयश.
  • परिणामी २०१८ पासून फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे यादीतील स्थान कायम राहिले आहे.
  • पाकिस्तानला दिलेल्या २७ पैकी ३ निकष पूर्ण करण्यास अपयश आल्याने हा निर्णय घेण्यात आला.
  • अटींच्या पूर्ततेसाठी पाकिस्तानला वेळोवेळी मुदत वाढवून देण्यात आली.
  • कोरोनामुळे २०१९ पर्यंत व नंतर ऑक्टोबर २०२० मध्ये एफएटीएफच्या बैठकीत फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही मुदत देण्यात आली.

भारताची भूमिका

  • जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझर व जमात उद दावाचा प्रमुख हाफिज़ सईद हे २००८ मधील मुंबई हल्ला आणि पुलवामा हल्ल्याप्रकरणी भारताला हवे आहेत.
  • पाकिस्तानने यावर कारवाई केली नाही.

करड्या यादीचा पाकिस्तानवर होणारा परिणाम

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि युरोपियन युनियनकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यास अडथळे

एफएटीएफ (Financial Action Task Force)

  • स्थापना : १९८९, G-७ देशांनी पुढाकाराने स्थापन केलेली आंतर-सरकारी संस्था
  • सदस्य : ३९ देश (भारत सदस्य देश) २ प्रादेशिक संस्था (युरोपियन युनियन, गल्फ कोऑपरेशन )
  • मुख्यालय : पॅरिस
  • उद्देश : आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेच्या अखंडतेसाठी दहशतवादी वित्तपुरवठा आणि इतर संबंधित धोक्यांशी लढण्यासाठी कायदेशीर, नियामक आणि कार्यकारी उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मानके ठरविणे आणि त्यांना प्रभावीपणे अंमलात आणणे.

एफएटीएफमधील याद्या :

  • अ) ग्रे यादी – ज्या देशांना दहशतवादी वित्तपुरवठा आणि समर्थन देण्याचे सुरक्षित आश्रयस्थान समजले जाते.
  • ब) काळी यादी – असहकारी देश किंवा प्रांत

     -आजतागायत या यादीत उत्तर कोरिया आणि इराण हे दोनच देश आहेत.

Contact Us

    Enquire Now