एन. रंगास्वामी

एन. रंगास्वामी :

  • जन्म : ४ ऑगस्ट, १९५० (वय ७० वर्षे)
  • जन्मठिकाण : पुदुचेरी
  • पक्ष
    • अखिल भारतीय एन. आर. काँग्रेस (२०११ पासून) (AINR Congress)
    • नॅशनल डेमोक्रॅटिक आघाडी (२०१४ पासून)
    • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२००९-११)
  • शपथ : राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन
  • पुदुचेरीचे नववे मुख्यमंत्री
  • शिक्षण : B. Com, एल. एल. बी- डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज, पुदुचेरी

राजकीय कारकीर्द :

  • विधानसभेवर निवड – १९९१, १९९६, २००१, २००६, २०२१ – थट्टानचावडी मतदारसंघ
  • २०११ आणि २०१६ – इंदिरानगर मतदारसंघ
  • १९९१ – पुदुचेरीचे कृषी मंत्री
  • १९९८ – सहकार मंत्री
  • २००० – शिक्षणमंत्री, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, नागरी उड्डाण, कला व सांस्कृतिकमंत्री
  • २००१-०८ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकीटावर मुख्यमंत्री
  • २०११ – काँग्रेस सोडून स्वत:च्या नविन पक्षाची स्थापना
  • २०११-१६ – एआयएनआर काँग्रेसच्या तिकीटावर मुख्यमंत्री
  • २०१६-११ – पुदुचेरी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता म्हणून निवड
  • २०२१ – एनडीएचे सदस्य असल्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री

कार्ये :

  • पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाला झोपडपट्टी मुक्त बनविण्यासाठी गृहनिर्माण योजना – पेरुथलाईवा कामराज योजना
  • काथिरकामम येथे पुदुचेरीतील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात
  • मिड-डे-मिल योजनेव्यतिरिक्‍त श्री. राजीव गांधी ब्रेकफास्ट योजनेअंतर्गत शासकीय व शासन सहाय्यित शाळांतील विद्यार्थ्यांना दूध आणि बिस्किटांचे वाटप
  • क्रमिक पुस्तके, वह्या, रेनकोट, छत्री तसेच सायकलचे गरिब शालेय मुलांसाठी विनामूल्य वाटप
  • दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना विनामूल्य स्टोव्ह व सिलेंडरसह मोफत एलपीजी कनेक्शन.
  • महिलांच्या नावे नोंदणीकृत असलेल्या स्थावर मालमत्तेच्या मुद्रांक शुल्कात ५०% सवलत
  • CENTAC च्या माध्यमातून वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यासाठी फी ची संपूर्ण भरपाई (CENTAC – Centralized Admission Committee)
  • संबोधन : मक्कल मुदलवार (लोकांचे मुख्यमंत्री)

अखिल भारतीय एन. आर. काँग्रेस

  • स्थापना : ७ फेब्रुवारी २०११
  • मुख्यालय : पुदुचेरी
  • पक्षाध्यक्ष : एन. रंगास्वामी
  • राजकीय तत्वे : सामाजिक लोकशाही
  • निवडणुक चिन्ह : पाण्याचा जग
  • उद्दिष्ट : साधेपणा, चांगुलपणा आणि पारदर्शकता (Simplicity, Fairness and Transparency)
  • दर्जा : तमिळनाडू, पुदुचेरी मधील राज्यपक्ष

Contact Us

    Enquire Now