एनएसईचा व्यवहार चार तास बंद

एनएसईचा व्यवहार चार तास बंद

  • राष्ट्रीय शेअर बाजाराला दूरसंचार पुरवठा करणाऱ्या दोघा पुरवठादारांच्या लिंकमध्ये अडचण आल्यामुळे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)चे काम चार तास बंद ठेवावे लागले.
  • व्यवहार करताना चुका आणि गोंधळ टाळण्यासाठी आधी क्यूचर अँड ऑप्शनचे तर नंतर समभागांचे सौदे थांबवले.
  • तांत्रिक बिघाडांच्या गोंधळानंतर अर्थमंत्र्यांनी सरकार संबंधित बँकिंग व्यवहार (पेन्शन, करभरणा, अल्पबचत इ.) करण्यास दिलेल्या परवानगीमुळे बँका आणि वित्तसंस्थांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली.

व्यवहारांवरील परिणाम

  • बाजार बंद पडण्यापूर्वी ज्या ट्रेडरने बाजारात मंदीचे व्यवहार केले होते, त्यांनी बाजारातील तेजी बघून मंदीच्या व्यवहारातून बाहेर पडण्यासाठी तेजीचे व्यवहार करणे क्रमप्राप्त होते.
  • अशा वेळी, निफ्‍टी १४,९८२ अंशांवर बंद भाव दिला.
  • अर्थमंत्रालयानी एनएसईवर झालेल्या तांत्रिक दोषाचा संपूर्ण अहवाल मागविला आहे.

राष्ट्रीय रोखे बाजार (National Stock Exchange)

  • स्थापना : २७ नोव्हेंबर १९९२ (सुरुवात १९९४)
  • मुख्यालय : मुंबई
  • एम. जे. फेरवानी समितीच्या (१९९१) शिफरसीनुसार देशातील १६ बँका व वित्तीय संस्थांनी स्थापना केली.

Contact Us

    Enquire Now