इस्रोचा नवीन पृथ्वी निरीक्षण उपग्रह – EOS-0३

 इस्रोचा नवीन पृथ्वी निरीक्षण उपग्रहEOS-03

  • राज्यसभेमध्ये प्रश्नाचे उत्तर देताना विज्ञान व तंत्रज्ञानाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-३  हा या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत प्रक्षेपित केला जाईल असे  प्रतिपादन केले.
  • कोविडमुळे बंद असलेले  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) काम पुन्हा सुरू करण्यात येईल.
  • मागील वर्षी ७ नोव्हेंबरला असाच एक उपग्रह EOS-0१  पीएसएलव्ही – C ४९  प्रक्षेपकाद्वारे निम्न कक्षेत(LEO) प्रक्षेपित केला गेला होता.
  • EOS-0१ चे अगोदरचे नाव RISAT-२BR२ असे होते.
  • EOS-0१ आणि EOS-0३  हे दोन्ही रडार इमेजिंग उपग्रह असून पृथ्वी निरीक्षणाचे काम करतील. यांना RISAT- २B  आणि RISAT- २BR१ हे पूर्वी प्रक्षेपित केलेले रडार इमेजिंग उपग्रह  सहाय्य करतील.
  • पृथ्वी निरीक्षण उपग्रह हे सुदूर संवेदन उपग्रह असून ते २००० किमी पर्यंतच्या कमी उंचीच्या कक्षामध्ये (Low Earth Orbit)  प्रक्षेपित केल्या जातात.
  • कमी उंचीवर असल्याने त्यांना पृथ्वीचे निरीक्षण करणे सोपे असते. तसेच उत्तर-दक्षिण अशा ध्रुवीय कक्षेमध्ये असल्याने एका दिवसामध्ये पृथ्वीच्या १६  प्रदक्षिणा ते घालतात. त्यामुळे संपूर्ण भारतावरून किमान चार ते पाच वेळा त्यांच्या प्रदक्षिणा होतील.
  • कृषी, पीक, नैसर्गिक संसाधने, वने  इत्यादी बाबींचे रिअल टाईम निरीक्षण करण्यास हे उपग्रह सक्षम असतात.
  • रडार इमेजिंग उपग्रहांना खराब वातावरण, कमी सूर्यप्रकाश यामुळे अडथळे निर्माण होत नाहीत.
  • इस्रोने या अगोदर RESOURCESAT- 2, 2A, CARTOSAT-1, 2, 2A, 2B, RISAT-1 and 2, OCEANSAT-2, Megha-Tropiques, SARAL and SCATSAT-1, INSAT-3DR, 3D अशा अनेक पृथ्वी निरीक्षण उपग्रहांचे प्रक्षेपण  केलेले आहे.
  • CARTOSAT :  कार्टोग्राफीसाठी  म्हणजे नकाशे बनवण्यासाठी.
  • RESOURCESAT :  पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचे (Resources) निरीक्षण करण्यासाठी
  • OCEANSAT : महासागराबद्दल अभ्यास करण्यासाठी
  • Mega-Tropiques : हा भारत आणि फ्रान्स यांचा संयुक्त उपक्रम असून उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये जलचक्र व वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०११ ला हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता.
  • SARAL : Satellite with ARgos & ALtika  हा सुद्धा इंडो-फ्रेंच  संयुक्त उपक्रम असून महासागरांचा अभ्यास करण्यासाठी २५ फेब्रुवारी २०१३ ला प्रक्षेपित करण्यात आला होता.

Contact Us

    Enquire Now