इस्रोकडून हेल्थ क्वेस्टचे उद्‌घाटन

इस्रोकडून हेल्थ क्वेस्टचे उद्‌घाटन

    • इस्रो अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी ४ ऑगस्ट २०२१ रोजी ‘हेल्थ क्वेस्ट’ अभ्यासाचे औपचारिक उद्‌घाटन केले.
    • हेल्थ क्वेस्ट : Health Quality Upgradation Enabled by Space Technology of ISRO (इस्रोच्या अंतराळ तंत्रज्ञानासह सक्षम आरोग्य गुणवत्ता सुधारणा)
    • उद्देश : मानवी त्रुटी कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे तसेच रुग्णालयांच्या आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागात शून्य दोष व उत्तम सेवा प्रदान करणे.

 

  • उद्दिष्ट :

 

    • इस्रो गुणवत्ता मानके आणि सर्वोत्तम पद्धतींनुसार देशाच्या आरोग्य सेवा प्रणालींचा दर्जा सुधारणे.

 

  • महत्त्वाचे मुद्दे :

 

    • संपूर्ण भारतातील २० खासगी रुग्णालयाद्वारे हा अभ्यास केला जाईल.
    • आरोग्यसेवा मानके तयार करण्यासाठी इस्रोची गुणवत्ता आश्वासन यंत्रणेसह एक अभ्यासगटही असेल.
    • हा क्वेस्ट अभ्यास इस्रोने असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाइडर्स इंडिया (एएचपीआय) आणि सोसायटी फॉर इमर्जन्सी मेडिसीन इन इंडिया (एसईएमआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमादरम्यान सुरू केला.

 

  • इतर:

 

    • भारतात कोविड-१९चा सामना करण्यासाठी इस्रोच्या ‘भवन जीओ पोर्टलची’ भूमिका १९ नोव्हेंबर २०२० रोजी UN ESCAP अहवालात ‘आशिया आणि पॅसिफिकमधील शाश्वत विकासासाठी भू-स्थानिक पद्धती २०२० : एक संग्रह’ यात नमूद केली आहे.

 

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation : ISRO)

 

  • स्थापना : १५ ऑगस्ट १९६९
  • अध्यक्ष : डॉ. के. सिवन
  • मुख्यालय : बंगळूरू

Contact Us

    Enquire Now