इटालियन नौसैनिकांवरील फौजदारी खटला बंद

इटालियन नौसैनिकांवरील फौजदारी खटला बंद

  • फेब्रुवारी २०१२ रोजी मॅसिमिलानो लॅटोरे व साल्वातोर गिरोनी यांनी केलेल्या केरळच्या किनाऱ्यावरील गोळीबारात भारताचे दोन मच्छिमार ठार झाले होते.
  • याप्रकरणी सुरू असलेल्या फौजदारी खटल्याचे कामकाज सर्वोच्च न्यायालयात १५ जून रोजी बंद करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय :

अ) केरळ उच्च न्यायालयाने पिडितांच्या वारसांना १० कोटींची इटलीने देऊ केलेली भरपाई दिली जाते की नाही यावर लक्ष ठेवावे.

ब) या १० कोटींपैकी प्रत्येकी चार कोटी रुपये दोन मच्छिमारांच्या नावे ठेवले जाणार आहेत तर दोन कोटी रुपये बोटीच्या मालकाला देण्यात येणार आहे.

क) भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय स्वीकारला असून या खटल्याची पुढील चौकशी इटली करणार आहे.

आंतरराष्ट्रीय लवाद :

अ) ३ : २च्या मताधिक्याने न्यायाधिकरणाने असा निर्णय दिला की, संयुक्त राष्ट्राच्या समुद्री कायद्याच्या आधिवेशनानुसार (UNCLOS) इटालियन नौसैनिकांना इटालियन राज्य अधिकारी म्हणून मुत्सद्दी अधिकार लाभले आहेत.

ब) न्यायाधिकरणाने या घटनेचा पुन्हा तपास सुरू करण्यासाठी इटलीच्या वचनबद्धतेची दखल घेत भारताला आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास प्रतिबंधित केले आहे.

Contact Us

    Enquire Now