आयएनएस शिवाजीच्या प्रमुखपदी अरविंद रावल

आयएनएस शिवाजीच्या प्रमुखपदी अरविंद रावल

  • लोणावळा येथील आयएनएस शिवाजीच्या प्रमुखपदाची सूत्रे कमोडोर अरविंद रावल यांनी स्वीकारली आहेत.
  • आयएनएस शिवाजीचे माजी प्रमुख कमोडोर रवनीश यांची दिल्लीतील नौदल मुख्यालयाच्या सागरी अभियांत्रिकी संचालनालयात बदली झाल्याने कमोडोर रावल यांची या पदावर नियुक्‍ती करण्यात आली.

अरविंद रावल यांच्याबद्दल

  • कमोडोर रावल हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी विद्यार्थी असून १९९२ मध्ये ते नौदलात दाखल झाले.
  • त्यांनी आयएनएस शिवाजी येथे बीईसी आणि सागरी आभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेतले.
  • तसेच त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून बी. एस्सी आणि बी. टेक आणि पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये पदवुत्यर पदवी घेतली.
  • त्याचबरोबर पुण्यातील शस्त्रास्त्र तंत्रज्ञान संस्था (आयएटी)आणि गोव्यातील नेव्हल वॉर कॉलजचे ते माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत.

आयएनएस शिवाजी

  • आयएनएस शिवाजीची स्थापना ब्रिटिश अमलाखाली ‘हर मॅजेस्टीज इंडियनशिप -शिवाजी’ या नावाने १९४५ मध्ये लोणावळा येथे झाली.
  • आयएनएस शिवाजी ही नौदलाची ‘अ’ श्रेणीतील प्रशिक्षण संस्था आहे.
  • ब्रीदवाक्य – ‘योगः कर्मसु कौशलम्‌’
  • आयएनएस शिवाजीतील प्रत्येक अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) मान्यतेनुसार चालतो.
  • येथून मरीन इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी मिळते.
  • आत्तापर्यंत, आयएनएस शिवाजीमधून दोन लाखांहून अधिक अधिकारी, नौसैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Contact Us

    Enquire Now