आता स्पर्धा लसीकरणाची

आता स्पर्धा लसीकरणाची

  • ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेक यांच्या कोरोनाप्रतिबंधक लसीला मान्यता दिल्याने आता येथे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लसीकरण सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
  • रशियानेही दुसऱ्या सप्ताहात लसीकरण मोहिमेची आखणी केली असून अमेरिकेत मॉडर्ना आणि फायझरच्या लसींना मान्यता मिळाल्यास तेथेही तातडीने लस दिली जाईल.
  • या तीन देशांनी घेतलेल्या निर्णयांमुळे लसीकरणाची स्पर्धा समोर आली आहे.
  • फायझरच्या लसीने कोरोनापासून 95 टक्के संरक्षण मिळाले आहे, असे ब्रिटनमधील औषध व आरोग्य उत्पादन नियंत्रण संस्थेने (MHRA) म्हटले आहे.
  • ही लस सुरक्षित असून ती लोकांना देण्यास काही हरकत नाही.
  • ही लस सर्व वय, वंश गटात परिणामकारक आणि सुरक्षित ठरली आहे.
  • ब्रिटनच्या स्वतंत्र नियामकांच्या मंजुरीनंतर आता ही लस पुरवण्यासाठी उपलब्ध होईल. त्यासाठी दर्जा, सुरक्षा व परिणामकारकता यावर ही लस योग्य ठरणे गरजेचे असते ते टप्पे फायझरच्या लसीने पार पाडले आहेत.

होणार काय?

  • ब्रिटनमध्ये पहिला डोस बहुधा 7 डिसेंबरला दिला जाणार असून पुढील आठवड्यात रशियातही लसीकरणाची मोहीम राबविली जाणार आहे.
  • अमेरीकेत लसीची परिणामकारता ठरविणाऱ्या समितीची बैठक 10 डिसेंबरला होणार आहे.
  • त्यात लसीला मान्यता मिळाल्यास चोवीस तासात लसीकरणाची तयारी अमेरिकेने केली आहे.
  • रशियातही पुढील आठवड्यात
  • डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात रशियात लसीकरण मोहीम राबवण्याचे आदेश अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी प्रशासनाला दिले.
  • रशियात कोरोनावरील ‘स्पुटनिक व्ही’ लसीची आधीच निर्मिती झाली असून आत्तापर्यंत एक लाख जणांचे लसीकरण झाल्याचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी सांगितले.
  • तूर्त तरी भारतात नाही
  • फाझरच्या लसीबाबत आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली असून भारतात दोन-तीन लसींची निर्मिती सुरू असताना भारत ही लस घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  • यात फायझरचा उत्पादनाबाबत भारताशी कोणताही संपर्क नसल्याचेही एक मोठे कारण आहे.
  • शिवाय ही लस महाग असून सर्वसामान्यांना परवडण्याजोगी नाही.
  • तिच्या साठवणुकीसाठी लागणारी उणे 70 अंश तापमानाची व्यवस्था भारतात सहजपणे उपलब्ध नाही, या त्यातील अडचणी आहेत.
  • त्यामुळे तूर्त तरी फायझरची लस भारतात येण्याची शक्यता नाही.

थोडे लसीविषयी

  • ही लस फायझर या कंपनीला जर्मनीच्या बायोएनटेक कंपनीने तयार करून दिली आहे.
  • या लसीच्या साठवणुकीसाठी सर्वात कमी तापमान लागणार असले तरी तशी व्यवस्था असल्याचे ब्रिटन सरकारने स्पष्ट केले.
  • साधारणपणे फ्रिजमध्ये ही लस 2 ते 8 अंश तापमानाला पाच दिवस टिकते.
  • तर उणे 70 अंश तापमानाला सहा महिने टिकते.
  • वितरणकेंद्रात ती साठवण्याची व्यवस्था आहे.
  • फायझरची ही लस ‘एमआरएनए’ प्रकारची असून ती माणसाच्या पेशींमध्ये कोविड-19 विषाणूशी लढण्याची क्षमता निर्माण करते.
  • 21 दिवसांच्या अंतराने यात दोन डोस म्हणजे मात्रा दिल्या जातात.
  • या लशीतच विषाणूच्या जनुकीय रचनेतील काही तुकड्यांचा वापर केला आहे.
  • यापूर्वी एमआरएनए लसीला माणसाला वापरण्यासाठी परवानगी दिली नव्हती.
  • संकल्पना ते प्रत्यक्ष निर्मिती हा टप्पा या लसीने 10 महिन्यांत पूर्ण केल्याने ती सर्वात वेगवान लस ठरली आहे.

Contact Us

    Enquire Now