आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी इंदोरची निवड

आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी इंदोरची निवड

  • भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदोर शहराची आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
  • तसेच या कार्यक्रमासाठी निवड होणारे इंदोर हे देशातील एकमेव शहर बनले आहे.

 

आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रम (International Clean Air Catalyst Programme) :

 

  • कालावधी – ५ वर्षे
  • लक्ष्य – स्वच्छ हवेच्या उपायांना गती देऊन कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत वायू प्रदूषणाशी लढा देणे.
  • भारतातील उद्देश – इंदोर महानगरपालिका आणि मध्यप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने शहरातील हवा शुद्ध करणे.
  • यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USID), जागतिक संसाधन संस्था (WRI) आणि पर्यावरण संरक्षण निधी (EDF) यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला फ्लॅगशिप कार्यक्रम आहे.
  • कार्य : यूएसआयडी आणि भागीदार हे स्थानिक समुदायांसह स्थानिक प्रदूषणाचे स्रोत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि स्वच्छ व निरोगी हवेसाठी उपाय योजतील.
  • कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, स्रोत जागरूकता अभ्यासण्यासाठी १.२ कोटी रुपयांचे देखरेख उपकरणे स्थापित केले जातील.
  • या कार्यक्रमांतर्गत भारतातील इंदोर आणि इंडोनेशियातील जकार्ता या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

 

USAID (United States Agency for International Development 

 

  • मुख्यालय : वॉशिंग्टन डीसी
  • प्रशासक : समंथा पॉवर

 

इंदोर:

 

  • मध्यप्रदेशातील सर्वाधिक लोकसंख्येचे व मोठे शहर.
  • १८ मे १७२४ रोजी पेशवे बाजीराव प्रथम यांनी माळव्यावर व नंतर होळकरांनी संपूर्ण नियंत्रण घेतल्यानंतर हे शहर व त्याचा परिसर मराठा साम्राज्यांतर्गत आला.
  • स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणाऱ्या भारतातील १०० शहरांपैकी एक.
  • स्वच्छ सर्वेक्षणानुसार २०१७, २०१८, २०१९, २०२० अशी सलग चार वर्षे भारतातील स्वच्छ शहर म्हणून स्थान.

Contact Us

    Enquire Now