आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गव्हर्नर मंडळाद्वारे आतापर्यंतचे सर्वात मोठे एसडीआर वाटप मंजूर

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गव्हर्नर मंडळाद्वारे आतापर्यंतचे सर्वात मोठे एसडीआर वाटप मंजूर

  • जागतिक अर्थव्यवस्थांमधील तरलता वाढवण्यासाठी व कोविड-19चा अर्थव्यवस्थांवरील परिणाम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) गव्हर्नर मंडळाने 650 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या किमतीचे एसडीआर (Special Drawing Rights) वाटप करण्याला मंजुरी दिली आहे.
  • आयएमएफच्या इतिहासातील एसडीआर वाटपाची ही सर्वात मोठी वेळ आहे.

एसडीआर म्हणजे काय?

  • अमेरिकन डॉलर, चायनीज युआन, जापनीज येन, युरो आणि ब्रिटिश पौंड या चलनांवर आधारित हे एक परिमाण आहे.
  • आयएमएफद्वारे याची सुरुवात 1969मध्ये करण्यात आली.
  • येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एसडीआर हे चलन नसून आयएमएफमधील सदस्य राष्ट्रांच्या असणाऱ्या कोट्याची क्षमता दाखवण्याचे माध्यम आहे.
  • वरील पाच चलनांना वेगवेगळा भार देऊन एसडीआरचे मूल्य ठरवले जाते.
  • ज्या देशाकडे जेवढे जास्त एसडीआर तो देश तेवढ्या प्रमाणामध्ये वरील पाच चलनांच्या रूपात तरलता प्राप्त करू शकतो.
  • एखादा श्रीमंत देश आपले एसडीआर एखाद्या गरीब देशाला सुद्धा देऊ शकतो. 
  • एसडीआरला ‘पेपर गोल्ड’ असेही म्हणतात.
  • सध्या वाटप करण्यात येणाऱ्या एसडीआरपैकी 275 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या किमतीचे एसडीआर हे विकसनशील आणि कमी उत्पन्न असणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या विकासासाठी राखीव ठेवले जातील. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) :

  • स्थापना : 27 डिसेंबर 1945 (ब्रेटनवूड परिषदेमध्ये)
  • मुख्यालय : वॉशिंग्टन, (अमेरिका)
  • सदस्यसंख्या : 189
  • अहवाल : world economic outlook, global financial stability report, fiscal monitor
  • उद्दिष्टे : 
    • आंतरराष्ट्रीय चलन विनिमय दर स्थिर राखण्यास मदत करणे. 
    • विविध देशांना व्यवहार तोलातील असंतुलन दूर करण्यासाठी सहाय्य करणे. 
    • आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे.

Contact Us

    Enquire Now