अन्नपूर्णा शिखरावर ‘गिरीप्रेमी’ची यशस्वी चढाई, प्रियंका मोहिते पहिली भारतीय महिला

अन्नपूर्णा शिखरावर ‘गिरीप्रेमी’ची यशस्वी चढाई, प्रियंका मोहिते पहिली भारतीय महिला

  • गिरीप्रेमी या पुण्यातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भूषण हर्षे, डॉ. सुमित मांढळे व जितेंद्र गवारे यांनी जगातील दहावे उंच शिखर माउंट अन्नपूर्णा-१ वर यशस्वी चढाई केली.
  • ज्येष्ठ गिर्यारोहक आणि श्री. शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखालील ‘गिरीप्रेमीची’ ही आठवी अष्टहजारी शिखर मोहीम असून अशी कामगिरी करणारी गिरीप्रेमी भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था.
  • यानंतर केवल कक्का, भगवान चवले व प्रियंका मोहिते यांनीही अन्नपूर्णाची यशस्वी चढाई केली.
  • साताऱ्याची प्रियंका मोहिते अन्नपूर्णा पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
  • आतापर्यंत केवळ २१०च्या आसपास गिर्यारोहकांनी माउंट अन्नपूर्णा-१ची यशस्वी चढाई केली आहे.

अन्नपूर्णा – १ शिखर :

  • उंची – ८०९१ मी. (जगातील दहावे उंच शिखर)
  • या पर्वतरांगेतील १३ शिखरे ७ हजार मीटर्सपेक्षा उंच
  • ५५ किमी लांबीचा अन्नपूर्णा शिखर समूह गंडकी व मार्श्यगदी या हिमनद्यांनी वेढलेला आहे.
  • स्थान : नेपाळ हिमालय
  • १९५० – मॉरिस हेर्झोग यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच गिर्यारोहकांनी सर्वप्रथम हे शिखर सर केले.

प्रियंका मोहिते

  • अन्नपूर्णा – १ शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला
  • २०१३ – माउंट एव्हरेस्ट (८८४९ मी) यशस्वी चढाई
  • २०१६ – माउंट किलीमांजारोवर चढाई
  • २०१८ – माउंट ल्होत्से, माउंट मकालूवरही चढाई

Contact Us

    Enquire Now