४ जुलै : आंतरराष्ट्रीय सहकार दिन
- दरवर्षी जुलै महिन्यातील पहिला शनिवार आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये हा दिवस ३ जुलै रोजी साजरा करण्यात आला.
- जिनिव्हा स्थित आंतरराष्ट्रीय सहकारी गटाकडून (ICA) १९२३ पासून हा दिवस साजरा केला जातो.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने १९९२ पासून जुलै महिन्याचा पहिला शनिवार आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून मान्य केला.
- सहकाराच्या तत्त्वाचे आणि विविध सहकारी संस्थांचे समाजाप्रती असलेले योगदान लोकांपर्यंत पोहोचावे, सहकाराची चळवळ जनमानसात रुजावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
- २०२१ या वर्षीची थीम : Rebuild better Together
- हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचा हवामानाला धोका आणि वाढते जागतिक तापमान यांचा धोका लक्षात घेऊन शाश्वत विकास ध्येये (SDG) मधील ध्येय क्रमांक १३ डोळ्यासमोर ठेवून ही थीम निवडण्यात आली आहे.
सहकार म्हणजे काय?
- व्ही. एल. मेहता यांनी सहकाराची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. – ‘समान आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी समान आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती स्वेच्छेने ज्या चळवळीत सामील होतात त्यास सहकार असे म्हणतात.’
- सहकाराची पुढील वैशिष्ट्ये आढळतात – समान उद्दिष्ट, समान गरजा, सामूहिक प्रयत्न, ऐच्छिक सहभाग, चळवळीचे स्वरूप.
- भारत सरकारने जुलै 2021 मध्ये नवीन मंत्रालय स्थापन केले आहे. त्याचे नाव ‘सहकार मंत्रालय’ असे आहे. अमित शहा यांचेकडे या मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे.
सहकारी संस्थांसाठी भारतीय राज्य घटनेतील तरतुदी :
- ९७वी घटनादुरुस्ती अधिनियम २०११ अन्वये सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण
या घटनादुरुस्तीद्वारे केलेले बदल :
१. कलम १९- सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार (संघटना/संघस्थपणे).
२. कलम ४३B – सहकारी संस्थांना चालना देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश
३. ९ B या भागाचा समावेश (सहकारी संस्था या नावाने)
आंतरराष्ट्रीय सहकारी गट (ICA) :
- स्थापना : १८९५ लंडन येथे
- उद्देश : जगातील सर्व सहकारी संस्थांना एकत्र आणून त्यांचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने
- मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड
कार्य :
१. जगातील व्यक्ती, सरकार, क्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांना सहकाराचे महत्त्व पटवून देणे.
२. सहकार चळवळीचा आवाज बनून त्याचे नेतृत्व करणे.
३. सहकार चळवळ वाढीस लागण्याच्या उद्देशाने योग्य धोरणात्मक वातावरण निर्मिती करणे.
४. विविध सहकारी संस्थांना तांत्रिक मदत करणे.