
२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
- दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन २९ जुलै रोजी साजरा केला जातो.
- २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या जागतिक व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
- वाघ व त्यांच्या नैसर्गिक अधिवास यांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करून त्यांचे महत्त्व जगाला पटवून देणे हा जागतिक व्याघ्र दिनाचा उद्देश आहे.
- वाघांची संख्या झपाट्याने कमी होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.
भारत आणि व्याघ्र संवर्धन:
- १९७२ मध्ये भारतात व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली. सध्या भारतात ५० तर महाराष्ट्रात ६ प्रकल्प आहेत.
अखिल भारतीय व्याघ्र गणना २०१८ अहवाल :
- नरेंद्र मोदी यांनी २९ जुलै २०१९ रोजी देशातील चौथ्या व्याघ्र गणनेचा अहवाल जाहीर केला.
- या अहवालानुसार २०१८ मध्ये भारतातील वाघांची एकूण संख्या २९६७ वर पोहोचली आहे. २०१४ मध्ये ही संख्या २२२६ होती.
- मागील चार वर्षांत देशातील वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे.
- यानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणारी पहिली पाच राज्ये :
- मध्य प्रदेश ५२६, कर्नाटक ५२४, उत्तराखंड ४४२, महाराष्ट्र ३१२, तामिळनाडू २६४.
- भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्यातर्फे देशात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते.
- पहिली व्याघ्रगणना २००६ मध्ये झाली. २०१८ची ही चौथी घटना आहे.
- जगात सर्वाधिक वाघांची संख्या भारतात आहे. त्या खालोखाल रशिया, इंडोनेशिया, मलेशिया व नेपाळचा क्रमांक लागतो.