हवामान अंदाजानुसार सरासरी ९८ टक्के पावसाची शक्यता
- कोरोनाच्या महामारीच्या सद्य स्थितीत सुखद वार्ता नैर्ऋत्य वाऱ्याचा ९८ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
- देशात ९८ टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस होणार आहे.
- महाराष्ट्रातील पावसाचा टक्का सर्वसाधारण असून मुंबईसह कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता.
- देशात ७५ टक्के पाऊस नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यापासून असतो.
- मान्सूनवर परिणाम करणारा “एक निनो” तटस्थ स्थितीमध्ये आहे, व तो पुढे सरकण्याचीही शक्यता कमी आहे.
- कोरोनामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. यंदा समाधानकारक पावसाचा हा अंदाज बळीराजा व भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आशेची चंदेरी कडा ठरावा असा आहे.
- १९६१ ते २०१० या कालावधीत देशात पावसाची सरासरी ८८ सेंटिमीटर म्हणजेच ८८० मिलीमीटर आहे.
- सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.
मागील ५ वर्षातील पावसाची स्थिती
वर्ष |
अंदाज |
पडलेला पाऊस |
२०१६ |
१०६ | ९७ |
२०१७ |
९६ |
९५ |
२०१८ |
९७ |
९१ |
२०१९ |
९६ |
११० |
२०२० | १०० |
१०९ |