हंसा न्यू जनरेशन विमानाचे यशस्वी उड्डाण

हंसा न्यू जनरेशन विमानाचे यशस्वी उड्डाण

 • हंसा (HANSA) न्यू जनरेशन (एनजी) विमानाने ३ सप्टेंबर २०२१ रोजी यशस्वी उड्डाण केले.
 • हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) विमानतळावरून अमित दहिया यांनी ४००० फूट उंचवीर ८० नॉटच्या वेगासह सुमारे २० मिनिटे उड्डाण केले.
 • पुढील चार महिन्यांत या विमानास प्रमाणित केले जाईल.

हंसाविषयी:

 • विकास: हंसाची डिझाईन आणि विकास वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)- राष्ट्रीय एअरोस्पेस प्रयोगशाळा (एनएएल), बंगळूरू येथे करण्यात आला आहे.
 • प्रकल्प संचालक: श्री अब्बानी रिंकू.
 • वैशिष्ट्ये: आरामदायक केबिनसह काचेचा कॉकपिट, डिजिटल नियंत्रित उच्च कार्यक्षम इंजिन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड फ्लॅप्स, कमी अधिग्रहण आणि कमी आॅपरेटिंग खर्च.
 • खालील ३ शाखांतील अधिकारी शास्त्रज्ञ किंवा अभियंत्यांद्वारा टेलिमेट्रीस्वरूपात फ्लाईटचे निरीक्षण केले गेले.
 1. नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए)
 2. सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्थनेस ॲण्ड सर्टिफिकेशन (सीईएमआयएलआयसी)
 3. सीएसआयआर- एनएएल.
 • हंसा एनजीला २०२० मध्ये डीजीसीएकडून प्रमाणित करण्यात आले होते व त्याच्या पहिल्या विमानाचे उत्पादन सप्टेंबर २०२० पासून सुरू करण्यात आले.

 

राष्ट्रीय एअरोस्पेस प्रयोगशाळा (National Aerospace Laboratory – NAL) :

 

 • स्थापना: १९५९
 • संचालक: श्री. जितेंद्र जाधव
 • मुख्यालय: बंगळूरू, कर्नाटक
 • ही देशातील नागरी क्षेत्रातील एकमेव एअरोस्पेस आर अँड डी प्रयोगशाळा आहे.

Contact Us

  Enquire Now