स्वयंसहायता गट (एसएचजी) – महिला सशक्तीकरण

स्वयंसहायता गट (एसएचजी) – महिला सशक्तीकरण

  • स्वयंसहायता गटांच्या आयोजनाद्वारे सामाजिक एकत्रीकरण आणि व्यवसाय विकासाची संकल्पना सर्वप्रथम १९८४ मध्ये प्रोफेसर यूसुफ ग्रामीण बँकेने अवलंबिली होती.
  • १९९० मध्ये आरबीआयने स्वयंसहायता गटांना अतिरिक्त क्रेडिट फ्लो मॉडेलचा दर्जा दिला.
  • स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेच्या (१९९९) अंतर्गत एसएचजीची स्थापना करून स्वयंरोजगार देऊन १९९९ ते २०११ दरम्यान दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्याचे उद्दिष्ट होते.
  • राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (एनआरएलएम) ३ जून २०११ रोजी सुरू करण्यात आले.
  • एसजीएसवायचे संपूर्ण एनआरएलएममध्ये रूपांतर १ एप्रिल २०१३ रोजी झाले.
  • यानंतर त्याच्या नावात बदल करून दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (DAY – NRLM) असे करण्यात आले आहे.

उद्देश :

१) ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वयंसहायता गटात सहभागी करणे.

२) सतत आर्थिक उपक्रम करण्यास सहाय्य करणे.

स्वयंसहायता गटांची पंचसूत्रे

१) नियमित बैठका

२) नियमित बचत

३) नियमित आंतरकर्जे

४) वेळेवर कर्जाची परतफेड

५) लेख्याचे अद्ययावत पुस्तक

  • एसएचजीच्या पुढील प्रमुख चार खांबांवर महिला सक्षमीकरण अवलंबून आहे.

१) सामाजिक एकत्रीकरण, गरिबांसाठी शाश्वत संस्थांची निर्मिती आणि संवर्धन

२) वैश्विक वित्तीय समावेशन

३) कर्ज, अन्न असुरक्षितता, आरोग्य संकट आणि स्थलांतर यासारख्या असुरक्षिततेचा सामना करण्यास सक्षम असलेली उपजीविका

४) सामाजिक समावेशन

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now