स्वच्छ पर्यटन स्थळात १२ स्थळांची निवड

स्वच्छ पर्यटन स्थळात १२ स्थळांची निवड

  • जलशक्‍ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशातील प्रतिष्ठित वारसा स्थळे, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचे परिवर्तन करण्याच्या दृष्टीकोनाचा अंगीकार करून स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या स्वच्छ प्रतीकात्मक स्थळे (स्वच्छ ऑयकॉनिक प्लेसेस STP) उपक्रमातंर्गत चौथ्या टप्प्यातील बारा प्रतीकात्मक स्थळांच्या यादीची घोषणा केली आहे.
  • स्वच्छ प्रतीकात्मक स्थळे (एसआयपी) उपक्रमाचे उद्दिष्ट :

पर्यटन स्थळ आणि त्याच्या परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे निकष यात सुधारणा करून देशी आणि परदेशी पर्यटकांचा अनुभव समुद्ध करणे.

स्वच्छ प्रतिकात्मक स्थळे (एस आय पी) उपक्रमाचे उद्दिष्ट :

१०० स्वच्छ प्रतिकात्मक स्थळांच्या ठिकाणी विशेषत: परिघीय आणि प्रविष्ट क्षेत्रात उच्च प्रतीचे सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे निकष साध्य करणे.

स्वच्छ प्रतीकात्मक स्थळे उपक्रम :

स्वच्छ प्रतीकात्मक स्थळे उपक्रम २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून सुरू करण्यात आला.

  • जलशक्‍ती मंत्रालयाचा पेयजल व स्वच्छता विभाग हा प्रकल्प गृह व शहरी व्यवहार मंत्रालय सांस्कृतिक मंत्रालय आणि संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्या संयुक्‍त विद्यमाने करीत आहे.
  • स्वच्छ प्रतीकात्मक स्थळे उपक्रमांतर्गत पहिल्या तीन टप्प्यांत आतापर्यंत ३० स्थळांची निवड केली असून चौथ्या टप्प्यासाठी १२ प्रतीकात्मक स्थळांची यादीची घोषणा केली आहे ती पुढीलप्रमाणे :

 

प्रतीकात्मक स्थळ राज्य
अजिंठा लेणी महाराष्ट्र
सांची स्तूप मध्यप्रदेश
कुंभलगड किल्ला राजस्थान
जैसलमैर किल्ला राजस्थान
रामदेवरा, जैसलमैर राजस्थान
गोवळकोंडा किल्ला, हैदराबाद तेलंगणा
सूर्य मंदिर, कोणार्क ओदिशा
रॉक गार्डन चंदीगड
दाल सरोवर, श्रीनगर जम्मू आणि काश्मीर
बांके बिहारी मंदिर, मथुरा उत्तरप्रदेश
कालीघाट मंदिर पश्चिमबंगाल
आग्रा किल्ला, आग्रा उत्तरप्रदेश

 

Contact Us

    Enquire Now