स्पेस-एक्सद्वारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर आवश्यक वस्तूंचा पुरवठा

स्पेस-एक्सद्वारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर आवश्यक वस्तूंचा पुरवठा

 • स्पेस-एक्सने तब्बल ४८०० पौंड वजनाच्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला केला.
 • यासाठी ड्रॅगन नावाच्या कूपीद्वारे हे पाठवण्याला आले.
 • यामध्ये मुंग्या,  आईस्क्रीम, अॅव्होकॅडो (एक फळ), कोळंबी रोबोट यांचा समावेश आहे.
 • स्पेस एक्स ही आतापर्यंतची २३वी मोहीम होती.
 • सध्या आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकावर सात अंतराळवीर संशोधन करत आहे. त्यासाठी ही मदत आवश्यक ठरणार आहे.
 • भविष्यामध्ये अंतराळवीरांना ताजे अन्न प्राप्त व्हावे यासाठी कोळंबीवर संशोधन होणार आहे तर वजविरहित अवस्थेत मुंग्यांच्या टनेलिंग वर्तनावर (Tunneling behaviour) अर्थात अन्न एका जागेवरून दुसरीकडे नेणे यावर संशोधन केले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय अवकाशस्थान (ISS – International Space Station)

 • स्थापना – २० नोव्हेंबर १९९८
 • ही एक प्रयोगशाळा असून पृथ्वीभोवती ४०० किलोमीटर्स उंचीवर फिरते. 
 • या अवकाशस्थानकाचा आकार एका फूटबॉल मैदानाएवढा आहे. तेथे अवकाशवीर विविध प्रकारचे प्रयोग करत असतात.
 • हे अवकाशस्थानक २०२४ पर्यंत कार्यरत राहणार आहे.

Contact Us

  Enquire Now