स्पेसएक्सची नागरिकांना अवकाशात पाठविणारी ‘इन्स्पिरेशन- 4’ मोहीम

स्पेसएक्सची नागरिकांना अवकाशात पाठविणारी ‘इन्स्पिरेशन- 4’ मोहीम

 • व्हर्जिन गॅलेक्टिक आणि ब्लू ओरिजिनने अनुक्रमे रिचर्ड ब्रॅन्सन आणि जेफ बेझोस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अवकाश सफरीनंतर, टेक विश्वातील अब्जाधीश एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाली आहे.
 • आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत अंतराळवीर तसेच आवश्यक कार्गोची ने-आण करण्याचे काम ही कंपनी करत होती, मात्र आता ती अवकाश पर्यटनाला सुरुवात करत आहे.
 • 15 सप्टेंबर 2021 रोजी चार नागरिक स्पेस एक्सच्या अवकाश कूपीतून 3 दिवसांच्या अवकाश सफरीकरता रवाना होणार आहेत.
 • या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेतील अब्जाधीश व फिनटेक कंपनी शिफ्ट 4 पेमेंट्‍सचे संस्थापक जरेड इसाकमॅन हे करणार आहेत.

वैशिष्ट्ये :

 • मोहिमेचे नाव: इन्स्पिरेशन 4 (Inspiration 4)
 • प्रक्षेपण: जॉन एफ केनेडी प्रक्षेपक केंद्र, फ्लोरिडा
 • सुमारे 12 टन वजनाची अवकाश कूपी ही फाल्कन- 9 या रॉकेटद्वारे अवकाशात झेपावणार आहे.
 • ही कूपी पृथ्वीपासून सुमारे 590 किमी उंचीवरून सुमारे 17000 किमी प्रति तास या प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती 3 दिवस फिरत राहणार आहे.
 • 18 सप्टेंबरला अटलांटिक समुद्रात पॅराशूटच्या सहाय्याने ही अवकाश कूपी उतरेल, असे या मोहिमेचे नियोजन आहे.

मोहिमेचे महत्त्व:

 • या तीन दिवसीय मोहिमेत माणसाच्या रक्तदाबापासून विविध वैद्यकीय प्रयोग निरीक्षणे केली जाणार आहेत.
 • या माहितीचा उपयोग भविष्यातील समानवी अवकाश मोहिमांसाठी होणार आहे.

यापूर्वीच्या अवकाश सफर मोहिमा :

क्रमांक नेतृत्व प्रवासी अवकाश सफर कालावधी
१. रिचर्ड ब्रॅनसोन (व्हर्जिन गेलेक्टिक) विमानाच्या माध्यमातून २ मिनिटे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर ८० किमी 
२. जेफ बेझोस (ब्लू ओरिजिन)  ३ मिनिटे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर १०७ किमी उंचीवर प्रवास

स्पेसएक्स: स्पेस एक्स्प्लोरेशन टेक्नॉलॉजीज काॅर्पोरेशन

 • खासगी एअरोस्पेस आणि अंतराळ परिवहन सेवा कंपनी
 • संस्थापक: एलॉन मस्क
 • स्थापना: 2002
 • मुख्यालय: हॉथॉर्न (कॅलिफोर्निया)
 • टेस्ला या आधुनिक तंत्रज्ञान आधारित (AI वापर) वाहन निर्मिती कंपनीची स्थापना एलॉन मस्क यांनीच केली आहे.
 • गेल्या वर्षी मे 2020 मध्ये नासा आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त मोहिमेत क्र्यु ड्रॅगन यानातून रॉबर्ट बेंहकेन आणि डग्लस हर्ले हे दोन अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्यात आले होते; तेव्हा मानवासहित यान पाठविणारी स्पेसएक्स ही पहिली खासगी कंपनी ठरली होती.

Contact Us

  Enquire Now