सोन्याचे हॉलमार्किंग आता बंधनकारक

सोन्याचे हॉलमार्किंग आता बंधनकारक

 • केंद्र शासनाने १६ जून पासून टप्प्याटप्प्याने सोन्याचे दागिने व कलाकृती यांना हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • पहिल्या टप्प्यांतर्गत २५६ जिल्हे व त्यांमधील वार्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या सोन्याच्या ज्वेलर्सचा समावेश असेल.

हॉलमार्किंग (Hallmarking) म्हणजे काय?

 • हॉलमार्किंग म्हणजे एखाद्या दागिन्यांमध्ये असणाऱ्या मौल्यवान धातूंच्या प्रमाणाची अधिकृत नोंद
 • ती संबंधित मौल्यवान दागिने/कलाकृतीच्या शुद्धतेची हमी असल्यासारखी असते.
 • ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) भारतामध्ये सोने व चांदीसाठी हॉलमार्किंग योजना चालविते.

वरील योजनेत खालील धातू समाविष्ट आहेत-

 • सोन्याचे दागिने व कलाकृती (Jewellery & Artefacts)
 • चांदीचे दागिने व कलाकृती

यामधून खालील गोष्टी वगळण्यात आल्या आहेत-

 • भारताच्या व्यापारी धोरणानुसार दागिन्यांची आयात-निर्यात, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठीचे दागिने, सरकारमान्य B२B देशांतर्गत प्रदर्शनासाठीचे दागिने
 • घड्याळे, फाउंटन पेन आणि कुंदन, पोलकी, जडाऊ सारखे विशेष प्रकारचे दागिने

बंधनकारक हॉलमार्किंग गरजेची का?

 • भारत जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. परंतु पुरेशी हॉलमार्किंग केंद्रे उपलब्ध नसल्याने केवळ ३०% भारतीय सोने हॉलमार्क केलेले आहे.
 • हॉलमार्किंगमुळे जनतेचे कमी कॅरेटेजपासून संरक्षण होईल. व दागिने खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
 • तसेच यामुळे पारदर्शकता येऊन ग्राहकांना गुणवत्तेचे आश्वासन मिळेल.

Contact Us

  Enquire Now