सोनू सूद : ‘देश के मेंटर्सचे’ ब्रॅण्ड अम्बॅसिडर
- दिल्ली सरकारच्या ‘देश के मेंटर्स’ उपक्रमाच्या ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून सोनू सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देश के मेंटर्स उपक्रम :
- दिल्ली येथील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांना चालना देणारा मार्गदर्शक (मेंटर) शोधण्यास मदत करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मार्गदर्शकाची भूमिका :
- विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित शंकांचे निरसण करणे.
- आठवड्यातील 10 मिनिटे त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काढणे आवश्यक आहे.
- डेस्क मेंटर्स योजनेअंतर्गत, 3 लाखांहून अधिक तरुण व्यावसायिक मार्गदर्शक करतील, तर जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
- हा एक कल्याणकारी उपक्रम असून दिल्ली सरकारी शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करेल.
सोनू सूद :
- जन्म: 30 जुलै 1973 (मोगा, पंजाब)
- अभिनेता, चित्रपट निर्माता, मानवतावादी.
- सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने गरजूंची, स्थलांतरित मजूरांची आणि विद्यार्थ्यांची कोणत्याही मोबदल्याशिवाय मदत करत आहे.
- त्याच्या या कार्यामुळे सप्टेंबर 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमातर्फे (यूएनडीपी) प्रतिष्ठित एसडीजी विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.