सोजात मेहंदी, ‘ज्युदिमा’ पेय व नागा काकडीस जीआय टॅग

सोजात मेहंदी, ‘ज्युदिमा’ पेय व नागा काकडीस जीआय टॅग

 • राजस्थानची औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध असलेली सोजात मेहंदी व ईशान्येकडील राज्यांतील आसामचे ज्युदिमा पेय आणि नागालँडची नागा काकडी यांना जीआय टॅग देण्यात आला आहे.

सोजात मेंदी (राजस्थान)

 • राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सोजात ह्या ठिकाणी या मेंदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, म्हणून हे ठिकाण ‘मेहंदी नगरी’ म्हणूनही ओळखले जाते.
 • या ठिकाणची भौगोलिक संरचना, स्थलाकृती, जलनिस्सारण प्रणाली, हवामान आणि माती, इत्यादी घटक मेंदी पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत.
 • ही मेंदी प्रामुख्याने तिचा सुगंध, औषधी महत्त्व व रंग यामुळे लोकप्रिय आहे.
 • मेंदीच्या पानांतील lawsoneची अधिक मात्रा प्राप्त करण्यासाठी नैसर्गिकरीत्या पर्जन्यावर आधारित याची लागवड करतात.
 • मेंदीच्या पानांना सुकवून त्यापासून सुगंधी तेल काढले जाते.
 • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, राजस्थान हे या मेंदीचे अधिकृत मालक आहेत.
 • जीआय टॅग मिळविणारे ‘सोजात मेहंदी’ हे राजस्थानचे १६वे उत्पाद आहे.

ज्युदिमा पेय (आसाम)

 • आसाममधील दिमासा समुदायाचे ‘ज्युदिमा’ हे पारंपरिक पेय आहे.
 • तांदूळ आणि काही विशिष्ट औषधी वनस्पतींपासून हे वाईनसारखे पेय बनविले जाते.
 • अशा प्रकारच्या पेयास जीआय मानांकन मिळविणारे ‘ज्युदिमा’ हे ईशान्येकडील पहिलेच पेय आहे.
 • आसामच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे हे पेय अविभाज्य भाग आहे.

नागा काकडी (नागालँड)

 • नागा काकडी ही तिचा विशिष्ट हिरवा रंग, गोडवा, कमी कॅलरीयुक्त व त्यातील उच्च पोटॅशियमच्या मात्रेसाठी प्रामुख्याने ओळखली जाते.
 • या रसाळ आणि मऊ काकडीची लागवड सेंद्रीय पद्धतीने केली जाते.
 • नागा शेतकरी पारंपरिकपणे झूम शेतीमध्ये मुख्यत: खरीप हंगामात (एप्रिल-मे) मिश्र पीक म्हणून तिची लागवड करतात.
 • कोन्यायकसारख्या काही जमाती वर्षभर ह्या काकडीचे उत्पादन घेतात.

Contact Us

  Enquire Now