सुनील गावस्कर
जन्म- 10 जुलै 1949
टोपण नाव- सनी, लिटील मास्टर
- कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करून पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडून स्मृती म्हणून कॅप देऊन गावस्कर यांचा सत्कार केला गेला. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सत्कार करण्यात आला.
कारकीर्द चार्ट –
- कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे पहिले फलंदाज
- पदार्पणाच्या मालिकेत 774 धावा करत गावस्करांनी वेस्ट इंडिज विरुद्ध ही मालिका भारताला जिंकून दिली होती
- 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य
- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्यांच्या नावावर होता; 2005मध्ये हा विक्रम सचिन तेंडुलकरने मोडून काढला
- पंच आणि रेफ्री म्हणून काम
गावस्कर यांनी लिहिलेली पुस्तके-
अ) सनी डेज (1976) – आत्मचरित्र
ब) Idols (1983)
क) Runs ‘n’ Ruins (1984)
ड) One Day Wonders (1986)
पुरस्कार व सन्मान –
1980 – पद्मभूषण
1994 – मुंबई चे शरीफ
2012 – बीसीसीआयचा प्रतिष्ठित कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार
2016 – मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे जीवनगौरव पुरस्कार