सुधारणांनंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा जर्मनी ५वा देश

सुधारणांनंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा जर्मनी ५वा देश

 • ८ जानेवारी २०२१ रोजी सुधारणांनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांसाठी त्याचे सदस्यत्व खुले झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा जर्मनी पाचवा देश बनला आहे.
 • भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केलेल्या प्रती परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द केल्या.

सुधारित आयएसए फ्रेमवर्क करार:

 • नवीन सुधारणेने संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांसाठी आयएसएचे सदस्यत्व खुले केले आहे.
 • यापूर्वी केवळ कर्कवृत्त व मकरवृत्तादरम्यानच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात अंशत: किंवा पूर्णपणे असलेल्या १२१ देशांसाठीच याचे सदस्यत्व खुले होते.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी :

  • स्थापना : ३० नोव्हेंबर २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅरिसमधील वातावरणीय बदलांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी केली.
  • मुख्यालय : गुरुग्राम, हरियाणा
  • सदस्य देश : १२४
 • उद्देश :
  • स्वच्छ हवा, शाश्वत पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक आणि हवामान यांच्या मान्यतेसाठी राष्ट्रांच्या गटाला एकत्र आणणे.
  • मुख्य उद्दिष्ट : जीवाश्म इंधनांवरील अवलंबन कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी काम करणे.
  • भारताने १७५ गिगावॅट अक्षय ऊर्जा स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे; ज्याअंतर्गत २०२२ पर्यंत १०० गिगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे.
  • नोव्हेंबर २०१६ मध्ये मोरक्कोच्या मर्राकेश येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रेमवर्क करार स्वाक्षरीसाठी खुला झाला.
  • आतापर्यंत एकूण ९८ देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे.

Contact Us

  Enquire Now