‘सिंबेक्स’चे अठ्ठाविसावे सत्र

‘सिंबेक्स’चे अठ्ठाविसावे सत्र

  • भारत-सिंगापूर यांच्यातील द्विपक्षीय संयुक्त सागरी युद्धाभ्यास ‘सिंबेक्स’चे २८ वे सत्र सप्टेंबरमध्ये पार पडले.
  • या युद्धाभ्यासात भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व आयएनएस रणविजय ही गाइडेड क्षेपणास्त्र विनाशिका युद्धनौका आणि जहाजावरील हेलिकॉप्टर, एएसडब्ल्यू कर्वेट आयएनएस किल्तान आणि कार्वेट आयएनएस कोरा या क्षेपणास्त्र संहारक युद्धनौका तसेच P8I हे नौदलाचे लांब टप्प्याच्या गस्ती विमान यांनी केले.
  • सिंगापूर हवाईदलाच्या (RSAF) चार F-१६ लढाऊ विमानांनीसुद्धा हवाई संरक्षण कवायतीत भाग घेतला होता.
  • १९९४ साली SIMBEX म्हणजेच सिंगापूर-भारत नौदल संयुक्त अभ्यासास सुरुवात.
  • भारतीय नौदलाच्या इतर कोणत्याही परकीय नौदलासोबत चालणाऱ्या द्विपक्षीय सराव सत्रांपैकी सर्वात जास्त काळ व सातत्याने सुरू असलेला युद्धाभ्यास आहे.
  • महामारीबाबत लागू असलेल्या निर्बंधांचे पालन करत या वर्षीचे SiMBEX सैनिकांच्या कवायती टाळून केवळ ‘सागरी’ स्वरूपाचे युद्धसराव करण्यात आले.
  • दोन्ही नौदलांना परस्परांच्या सागरी माहिती फ्यूजन केंद्रात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
  • पाणबुडी बचावकार्यात एकमेकांना सहकार्य करण्याचा करारही दोन्ही नौदलांनी नुकताच केला आहे.
सरावाचे नाव सहभागी देश
१) IMBEX भारत-म्यानमार
२) अल-नगाह-३ भारत-ओमान
३) बोल्ड-कुरुक्षेत्र भारत-सिंगापूर
४) SAMPRITI-८ भारत-बांग्लादेश
५) AUSINDEX भारत-ऑस्ट्रेलिया
६) मित्र-शक्ती भारत-फ्रान्स
७) वरूण भारत-फ्रान्स
८) गरुड-६ भारत-फ्रान्स
९) युद्धाभ्यास भारत-अमेरिका
१०) मैत्री भारत-थायलंड
११) मलबार भारत, जपान आणि अमेरिका
१२) शिन्यु-मैत्री भारत-जपान
१३) धर्मा गार्डियन भारत-जपान

Contact Us

    Enquire Now