सागरी सुरक्षेसाठी मोंदीची पाच तत्त्वे
- समुद्रमार्गाने होणारा व्यापार सुरक्षित आणि वृद्धिंगत होण्यासाठी तो निर्बंधमुक्त करणे आवश्यक आहे असे पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले.
- सुरक्षा समितीचे अध्यक्षपद एक ऑगस्टला भारताकडे झाल्यानंतर सागरी सुरक्षेवर चर्चा करण्यात आली.
- सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषविणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
- सुरक्षित, संरक्षित आणि स्थिर व्यापारासाठी भारतातर्फे ‘सागर’ हे अभियान राबविले जात आहे. त्यात सर्वांच्या सुरक्षेचा आणि विकासाचा विचार केला आहे.
मोदी यांची सुरक्षा परिषदेतील पाच तत्त्वे
- सागरी व्यापारातील अडथळा दूर करणे.
- सागरी वादांचे शांततामय मार्गाने आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निराकारण करणे.
- अराष्ट्रीय घटकांमुळे असलेले सागरी धोके आणि नैसर्गिक संकटांचा एकत्रितपणे सामना करणे.
- सागरी पर्यावरण व स्रोतांचे जतन करणे.
- जबाबदार सागरी संपर्क प्रस्थापित करणे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद
- मुख्यालय : न्यूयॉर्क
- सदस्य : १५ यात ५ स्थायी आणि १० अस्थायी
- स्थायी सदस्य : अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन
- नुकतेच भारताचे ऑगस्ट २०२१ साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद स्वीकारले.
- UNSCच्या अस्थायी सदस्य म्हणून २ वर्षांचा कार्यकाळ भारताने जानेवारी २०२१पासून सुरू केला.
- विशेष : संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान असतील.