सहाव्या ब्रिक्स दहशतवाद विरोधी कार्यगटाच्या अध्यक्षपदी भारत

सहाव्या ब्रिक्स दहशतवाद विरोधी कार्यगटाच्या अध्यक्षपदी भारत

  • 28 आणि 29 जुलैला ब्रिक्स (BRICS) च्या दहशतवाद विरोधी कार्यटाची सहावी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. या बैठकीचा अध्यक्ष भारत होता.
  • भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव (joint secretary for counter terrorism) महावीर सिंघवी यांनी अध्यक्षपद भूषवले.
  • सदर बैठकीला ब्रिक्सचे सर्व सदस्य देश हजर होते.
  • बैठकीचे महत्त्वाचे निष्पन्न म्हणजे सर्व सदस्यांनी दहशतवाद विरोधी क्शन प्लॅनचा स्वीकार केला. (BRICS Counter Terrorism Action Plan)
  • 26-27 जुलैला या कार्यगटाच्या बैठकीपूर्वी ब्रिक्सच्या 5  उप-कार्यगटांची  बैठक पार पडली. या बैठकीचा विषय  दहशतवादी हेतूसाठी इंटरनेटचा गैरवापर, दहशतवाद्यांना होणाऱ्या वित्तपुरवठ्यास आळा घालने, कट्टरतावादी विचारधारेला रोखणे (deradicalization) आणि विदेशी दहशतवाद्यांशी लढा देणे हे होते.

ब्रिक्स (BRICS – Brazil, Russia, India, China, South Africa)

स्थापना :  16 जून 2009 (रशिया येथे)

– सुरुवातीला ब्राझील. भारत. चीन व रशिया  केवळ एवढे सदस्य होते.

– 2011 मध्ये चीन मध्ये भरलेल्या तिसऱ्या परिषदेत दक्षिण आफ्रिका सदस्य झाला  आणि BRIC  चे नाव बदलून BRICS  झाले.

– जागतिक लोकसंख्येच्या 41 टक्के, जागतिक जीडीपीच्या 24 टक्के आणि जागतिक व्यापाराच्या 16 टक्के व्यापार केवळ ब्रिक्स देशांमधून होतो.

– 2021 मध्ये ब्रिक्सच्या अध्यक्षपदी भारत आहे.

Contact Us

    Enquire Now