
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहन शांतन गौडर यांचे निधन
- सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश मोहन एम. शांतन गौडर यांचे गुरगाव येथील खासगी रुग्णालयात वयाच्या 62व्या वर्षी निधन झाले.
- ते सर्वोच्च न्यायालयाचे नववे ज्येष्ठ न्यायाधीश होते.
- विश्वास, धार्मिक स्वातंत्र्य आणि अत्यावश्यक धार्मिक कार्यप्रणालींच्या प्रश्नांची तपासणी करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश शरद बोबडे खंडपीठावरील नऊ न्यायाधीशांपैकी न्यायमूर्ती शांतन गौडर यांचा समावेश होता.
- जन्म – 5 मे 1958, चिक्केरूर, कर्नाटक
- मृत्यू – 25 एप्रिल, 2021, मेदांता, गुरगाव
- शिक्षण – कर्नाटक विद्यापीठ
- सुरुवातीला त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून सराव केला.
- त्यांची 2003 मध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयात नियुक्ती झाली.
- 29 सप्टेंबर 2004 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली.
- त्यानंतर 1 ऑगस्ट 2016 रोजी केरळ उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.
- 22 सप्टेंबर 2016 रोजी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली.
- तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली.
- शांतन गौडर यांची सर्वोच्च न्यायालयातील कारकीर्द 17 फेब्रुवारी 2017 ते 4 मे 2023 पर्यंत होती.
- पण, तत्पूर्वीच 25 एप्रिल 2021 रोजी त्यांचे फुप्फुसांच्या संसर्गाने निधन झाले.
कारकीर्द थोडक्यात
- कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश – 29 सप्टेंबर 2004 ते 31 जुलै 2016
- केरळ उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश – 1 ऑगस्ट 2016 ते 21 सप्टेंबर 2016
- केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – 22 सप्टेंबर 2016 ते 17 फेब्रुवारी 2017
- सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश – 17 फेब्रुवारी 2017 ते 4 मे 2023 (सेवानिवृत्ती लक्षात घेता)