समुद्रसेतू – II या मोहिमेसाठी भारतीय नौदलाची सात जहाजे तैनात

समुद्रसेतू – II या मोहिमेसाठी भारतीय नौदलाची सात जहाजे तैनात

 • कोविड 19 विरुद्धच्या देशाच्या लढ्याचे समर्थन करण्यासाठी आणि समुद्रसेतू-II या मोहिमेचा एक भाग म्हणून विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेल्या क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी सात भारतीय नाैदल नौका तैनात करण्यात आल्या आहेत.
 • आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची, आयएनएस तलवार, आयएनएस तबर, आयएनएस त्रिकंद, आयएनएस जलाश्व आणि आयएनएस ऐरावत अशी तैनात करण्यात आलेल्या भारतीय नौदल नौकांची नावे आहेत.
 • आयएनएस कोलकाता व आयएनएस तलवार हा पर्शियन आखातात तैनात केलेला पहिला जहाजांचा ताफा होता ज्यांना त्वरित या कामासाठी वळवण्यात आले असून त्यांनी 30 एप्रिल 2021 रोजी मनामा, बहारीन बंदरात प्रवेश केला.
 • आयएनएस तलवार हे 40 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (LMO) घेऊन मायदेशी परतले आहे.
 • आयएनएस कोलकाता वैद्यकीय पुरवठा मिळविण्यासाठी दोहा, कतार येथे रवाना झाले आहे आणि त्यानंतर द्रवरूप ऑक्सिजनने भरलेल्या टाक्या आणण्यासाठी ते कुवेतला मार्गस्थ होईल.
 • तसेच पूर्व किनारपट्टीवर, आएनएस ऐरावतलासुद्धा या कामासाठी वळविण्यात आले आहे.
 • गेल्या वर्षी ‘समुद्रसेतु’ मोहिमेदरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या आयएनएस जलाश्वची देखभाल, दुरुस्ती करून या महिमेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी त्याला तैनात करण्यात आले आहे.
 • द्रवरूप ऑक्सिजन आणण्यासाठी आयएनएस ऐरावत सिंगापूरमध्ये दाखल होणार आहे आणि अल्प मुदतीच्या सूचनेनुसार वैद्यकीय साठा आणण्यासाठी आयएनएस जलाश्वही त्या प्रांतात सज्ज ठेवण्यात आले आहे.
 • अरबी समुद्रात तैनात आयएनएस कोची, आयएनएस त्रिकंद आणि आयएनएस तबर या दुसऱ्या तुकडीलाही राष्ट्रीय प्रयत्नात सामील करून घेण्यात आले आहे.
 • दक्षिणी नौदल कमांडकडून आयएनएस शार्दूल या मोहिमेसाठी 48 तासांत सामिल होण्यासाठी सज्ज आहे.
 • कोविड-19 विरुद्धच्या देशाच्या लढ्यात गरजेनुसार अधिक नौका तैनात करण्याची भारतीय नौदलाची क्षमता आहे.
 • ‘समुद्रसेतू’ मोहीम गेल्या वर्षी नौदलाने सुरू केली होती आणि कोविड 19च्या उद्रेकात शेजारच्या राज्यांमध्ये अडकलेल्या सुमारे 4000 भारतीय नागरिकांना यशस्वीरीत्या मायदेशी आणण्यात आले होते.

Contact Us

  Enquire Now