
सतीश काळसेकर
- जन्म : १९४३ (वेंगुर्ले सिंधुदुर्ग)
- मृत्यू : २४ जुलै, २०२१ (पुणे)
जीवनपरिचय
- मराठीतील प्रसिद्ध कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिक आणि मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे निधन झाले.
- ते ७८ वर्षांचे होते.
- १९७१ साली त्यांचा ‘इंद्रियोपनिषद’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला.
- महाविद्यालयाच्या नियतकालिकातून नवाकाळ, मराठा यासारख्या वर्तमान पत्रातूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या.
- त्यांनी देशी-विदेशी भाषांतील अनेक कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद केले होते.
- तसेच हिंदी, बंगाली, मल्याळम्, इंग्रजी, पंजाबी यांसह अन्य भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत.
- त्यांच्या कवितेचा गाभा महानगरीय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगात येणारे उत्कट भावनात्मक अनुभव हा होता.
- मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रातील लोकवाङ्मय ग्रह, मुंबई या प्रकाशन संस्थेच्या संपादनाचे कार्य त्यांनी केले होते.
- राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे ते सदस्यदेखील होते.
- काळसेकर यांनी मागोवा, तात्पर्य, लोकवाङ्मय, तापसी, चक्रवर्ती आणि आपले वाङ्मय वृत्त इत्यादी नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी सांभाळली होती.
कवितासंग्रह
- १९७१ – इंद्रियोपनिषद
- १९८२ – साक्षात्
- १९९७ – विलंबित
- २०११ – नव्या वसाहतीत, अरुण कमल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद
गद्य लेखन
- २०१० – वाचणाऱ्यांची रोजनिशी
- २०१५ – पायपीट
- मी भयंकराच्या दारात उभा आहे. (नामदेव ढसाळ यांची कविता, संपादन – प्रज्ञा दया पवारसह २००७)
- आयदान : सांस्कृतिक ठेवा (संपादन – सिसिलिया) (कार्व्हालोसह, २००७)
- निवडक अबकडई (संपादन – अरुण शेवतेसह २०१२)
मिळालेले पुरस्कार
- १९७७ – सोव्हिएल लँड नेहरू पारितोषिक
- १९९७ – लालजी पेंडसे पुरस्कार
- १९९८ – बहिणाबाई पुरस्कार कवी
- १९९८ – कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार
- १९९८ – महाराष्ट्र साहित्य परिषद
- १९९९ – महाराष्ट्र शासन पुरस्कार
- २००६ – कैफी आझमी पुरस्कार
- २०१०-११ – महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार
- २०१३ – साहित्य अकादमी पुरस्कार
- २०१८ – महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार