संयुक्त राष्ट्र दिवस

संयुक्त राष्ट्र दिवस

 • संयुक्त राष्ट्रसंघाची उद्दिष्टे व कर्तृत्व याबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी संयुक्त राष्ट्रदिन दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
 • सन १९४८च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) हा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले.

संयुक्त राष्ट्र संघटना  (United Nations Organisation)

 • स्थापना : २४ ऑक्टोबर १९४५
 • मुख्यालय : न्यूयॉर्क, अमेरिका 
 • सदस्यता : १९३ सदस्य देश (भारत हा संस्थापक सदस्य आहे.) 
 • अध्यक्ष : जोसेफ डाईज, महासचिव : ॲटोनियो गुटेरस 
 • संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर देशा देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठाता पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. 
 • संयुक्त राष्ट्रसंघाची काही प्रमुख संस्था खालीलप्रमाणे आहेत.

१) आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा)

२) सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे ठराव करणारी)

३) आर्थिक व सामाजिक परिषद

४) आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग)

५) विश्व स्वास्थ्य संघटना (WHO)

६) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)

७) युनिसेफ

८) विश्व अन्न कार्यक्रम (WFP)

९) युनेस्को (UNESCO)

१०) विश्व बँक (WB) इत्यादी

संयुक्त राष्ट्रसंघाची उद्दिष्टे :

 • जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे.
 • राष्ट्राराष्ट्रांत मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे.
 • आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे.
 • आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदे प्रस्थापित करून शांततेला चालना देणे.

Contact Us

  Enquire Now