श्रीकांत मोघे

श्रीकांत मोघे

जन्म – 6 नोव्हेंबर 1929 (किर्लोस्करवाडी)

निधन – 6 मार्च 2021 (पुणे)

अल्पपरिचय :

शिक्षण – किर्लोस्करवाडी हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण

            – पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी

            – मुंबई विद्यापीठातून बी आर्च ही पदवी संपादन केली  

 • आकाशवाणी पुणे केंद्रावर एकांकिका, काव्यवाचन, भावगीत गायन अशा प्रांतात मुशाफिरी
 • आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून मराठी बातम्या देत
 • 1951मध्ये श्रीकांत मोघे यांनी शरद तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पु. ल. देशपांडे यांच्या ‘अंमलदार’ या नाटकाचे सादरीकरण केले
 • 1955 मध्ये महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले व शासनाचे पारितोषिक मिळाले
 • नवी दिल्ली येथील सॉंग अँड ड्रामा डिव्हिजनच्या ‘मिट्टी कि गाडी’ (मृच्छकटिका) या नाटकाच्या सूत्रधाराची भूमिका केली
 • ते ‘पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी अमेरिका’ युरोप व दुबई इत्यादी ठिकाणी दौरे करत
 • ते उत्तम चरित्रकार आणि वास्तुविशारद होते
 • साठहुन अधिक नाटके आणि पन्नास पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले
 • मराठी चित्रपट सृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून प्रसिद्धी

कारकीर्द :

अ) चित्रपट – उंबरठा, गंमत जंमत, आम्ही जातो आमुच्या गावा, मधुचंद्र, सिंहासन, दैव जाणिले कुणी, काका मला वाचवा, सूत्रधार, एक क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके (हिंदी), कालचक्र (हिंदी)

ब) नाटके – अजून यौवनात मी, गरुड झेप, लेकुरे उदंड वाऱ्यावरती, तुझं आहे तुझपाशी, देवकी, अपूर्व बंगाल, अबोल अशी सतार, मृत्युंजय, अश्वमेघ, शेर शिवाजी (हिंदी), कृष्णाकाठी कुंडल, सुंदर मी होणार, गारंबीचा बापू, वाऱ्यावरची वरात

क) दूरचित्रवाणी मालिका – अजून चांदरात आहे, भोलाराम, अवंतिका, स्वामी (राघोबादादा), उंच माझा झोका

ड) आत्मचरित्र – नटरंगी रंगला

पुरस्कार व सन्मान :

2005-06 : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार  

2010 : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार

2012 : मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष (सांगली)

2013 : ग. दि. माडगूळकर पुरस्कार

2014 : महाराष्ट्र सरकारचा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार

Contact Us

  Enquire Now