शैक्षणिक संस्थांना मिळणारी सरकारी मदत मूलभूत अधिकार नाही – सर्वोच्च न्यायालय

शैक्षणिक संस्थांना मिळणारी सरकारी मदत मूलभूत अधिकार नाही – सर्वोच्च न्यायालय

  • अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, भारतीय संविधानातील कलम ३० नुसार स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्थांना दिली जाणारी सरकारी अनुदाने हा अल्पसंख्याक समुदायाचा मूलभूत अधिकार नाही.

पार्श्वभूमी 

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९२१च्या मध्यवर्ती शिक्षण कायद्याची तरतूद असंवैधानिक म्हणून घोषित केली.
  • या निर्णयाविरोधात उत्तर प्रदेश सरकारने दाखल केलेल्या अपीलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

काय आहे संविधानातील कलम ३०?

  • कलम  ३० (१) – धार्मिक वा भाषिक अल्पसंख्याकांना आपल्या आवडीनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा अधिकार आहे.
  • कलम ३० (२) – राज्य सहाय्य देताना एखादी शैक्षणिक संस्था विशिष्ट  धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक गटाची आहे, या आधारावर भेदभाव करणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार

  • सरकारी मदत हा धोरणात्मक निर्णय असून संस्थेचे हित व सरकारची क्षमता या मुद्द्यांवर अवलंबून असतो.
  • आर्थिक अडथळे आणि कमतरता हे घटक सरकारी मदत देताना आधारभूत मानले जातात, ज्यात मदतीसाठीचा निर्णय व वितरणाची पद्धत या दोन्हींचा समावेश केला जातो.

निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

  • सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर अनुदान मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला तर अल्पसंख्याकांच्या (भाषिक वा धार्मिक) शैक्षणिक संस्था ‘अधिकाराची बाब’ म्हणून या निर्णयास आवाहन देऊ शकत नाही.
  • एखादी संस्था अनुदानाच्या योग्य वापर व अटींसह ते स्वीकारू शकते.
  • जर एखाद्या संस्थेस अनुदानाच्या अटी मान्य नसतील तर त्यांचे पालन करावयाचे नसेल तर अशा समस्यांना अनुदान नाकारणे व स्वतःच्या मार्गाने पुढे जाणे हे पर्याय उपलब्ध असतात.
  • त्याचप्रमाणे एखाद्या संस्थेस अनुदान स्वतःच्या अटींवर हवे असेल तर त्यास परवानगी दिली जाणार नाही.

निष्कर्ष

  • सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे कलम ३० नुसार धार्मिक वा भाषिक अल्पसंख्याकांना आपल्या निवडीनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार आहे; मात्र त्यांना दिली जाणारी सरकारी अनुदाने हा मूलभूत अधिकार नाही.
  • या निर्णयामुळे मूलभूत हक्क हे मर्यादित स्वरूपाचे असून त्यावर योग्य निर्बंध घालता येतात, हे स्पष्ट होते.
  • उदा. जलीकट्टू खटला – तमिळनाडू (कलम २९)

मूलभूत हक्क :

  • राज्यघटनेच्या भाग ३, कलम १२ ते ३५ मध्ये तरतूद
  • मूलभूत हक्कांच्या निर्मितीवर अमेरिकन हक्कांच्या सनदेचा (बिल ऑफ राईट्‌स) आणि मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा (१९४८) यांचा प्रभाव आहे.

वैशिष्ट्ये :

  • १) काही हक्क नकारात्मक असून काही सकारात्मक आहेत.
  • २) न्यायप्रविष्ट (न्यायालयीन संरक्षण) आहेत.
  • ३) मर्यादित आहेत.
  • ४) केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यासह सर्व सार्वजनिक अधिसत्तांवर मूलभूत हक्क, बंधनकारक आहेत.
  • ५) घटनेच्या मूलभूत संरचनेच्या अधीन राहून त्यात दुरुस्ती करता येते.

मूलभूत हक्क :

कलम तरतूद
१४ ते १८ समतेचा हक्क
१९ ते २२ स्वातंत्र्याचा हक्क
२३ ते २४ पिळवणुकीविरुद्धचा हक्क
२५ ते २८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
२९ ते ३० सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क
३२ घटनात्मक उपाययोजनेचा हक्क

 

Contact Us

    Enquire Now