शासकीय वसतिगृह योजना
- स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत १० जिल्ह्यांतील ४१ तालुक्यांच्या ठिकाणी वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.
- महाराष्ट्रात २३२ साखर कारखाने असून ८ लाख ऊसतोड कामगार आहेत.
- यासाठी येणाऱ्या खर्चापोटी स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला साखर कारखान्यांकडून प्रतिटन १० रुपये आणि राज्य शासनाकडून १० रुपये असे एकूण २० रुपये प्रमाणे प्राप्त होणाऱ्या निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली