शशिकला जवळकर

शशिकला जवळकर

जन्म: ८ जानेवारी १९३३ (सोलापूर) 

निधन: ४ एप्रिल २०२१ 

  • सत्तरचे दशक अभिनयाने गाजवणार्‍या मराठी अभिनेत्री व खलनायिका 
  • वयाच्या पाचव्या वर्षापासूनच नृत्य व गाण्याचे धडे गिरवण्याची सुरुवात 
  • वडिलांचे उद्योगात नुकसान झाल्यामुळे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले 
  • त्यावेळेच्या उत्कृष्ट गायिका अभिनेत्री नुर जहा यांना भेटून ‘झिनन’ या चित्रपटातून अभियानास सुरुवात केली 
  • व्ही. शांताराम यांनी ‘तीन बत्ती चार रास्ता’मध्ये (१९५३) बहुभाषिक भावजयींपैकी मराठी भावजयची भूमिका केली. 
  • १९५३ नंतर त्यांनी खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आणि गाजवल्या 
  • २००५ पर्यंत त्यांनी शंभराहून अधिक चित्रपटात काम केले 

चित्रपट:

अ) हिंदी: नॊ दो ग्यारह, अनपढ, कभी खुशी कभी गम, कानून, सरगम, चोरी चोरी, जंगली, रॉकी, घर घर की कहानी, हरियाली और रास्ता, बादशहा.

ब) मराठी: जागा भाड्याने देणे आहे, महानंदा, पठ्ठे बापूराव, लेक चालली सासरला, चाळीतील शेजारी, धाकटी सून.

क) मालिका: जीना इसी का नाम है, अपनापन, दील देके देखो, सोनपरी.

ड) पुरस्कार:

अ) आरती आणि गुमराह या चित्रपटांतील खलनायिकेच्या भूमिकांसाठी फिल्मफेअर 

ब) २००७ – पद्मश्री 

क) २०१४ – पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून जीवनगौरव पुरस्कार 

ड) २०१५ – राज कपूर कारकीर्द गौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन) 

इ) व्ही. शांताराम लाइफ टाइम अचिव्हमेंट अवार्ड 

समाजसेवा: 

  • १९८० च्या दशकात मदर तेरेसांसोबत नऊ वर्षे मिशनरीज ऑफ चॅरिटीजमध्ये कुष्ठरोग्यांची सेवा, फरश्या पुसणे इत्यादी कामे केली

Contact Us

    Enquire Now