व्हिएतनामच्या पंतप्रधानपदी फाम मिन्ह चीन्ह
- व्हिएतनामच्या १५व्या नॅशनल असेंब्ली (एनए) च्या मतदान निकालानुसार २०२१-२६ या कालावधीसाठी फाम मिन्ह चीन्ह यांची पंतप्रधानपदी पुनर्नेमणूक झाली आहे.
- चीन्ह हे १३ व्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनाम सेंट्रल कमिटी पॉलिटब्यूरोचे सदस्य असून १५व्या एनएच्या पहिल्या सत्रात ९५.९९ टक्के प्रतिनिधींच्या मंजुरीने त्यांची नियुक्ती झाली आहे.
- यापूर्वी ५ एप्रिल २०२१ रोजी त्यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली होती.
- पदाची शपथ घेताना चिन्ह यांनी व्हिएतनामच्या समाजवादी प्रजासत्ताक राष्ट्र, लोक आणि संविधानाशी पूर्णपणे निष्ठावान राहण्याचे तसेच सीपीव्ही, राज्य आणि लोकांनी दिलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे वचन दिले आहे.
व्हिएतनाम
- राजधानी : हनोई
- राष्ट्रपती : गुथेन जुआन कुक
- पंतप्रधान : फाम मिन्ह चीन्ह
- शेजारील देश : चीन (उत्तरेस), लाओस (वायव्येस), कंबोडिया (नैर्ऋत्येस)
- चीन आणि जपाननंतर सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेला जगातील तिसरा देश आहे.