विवेक (तमिळ अभिनेता)

विवेक (तमिळ अभिनेता)

 • जन्म : १९ नोव्हेंबर १९६१
 • जन्मस्थळ : नाला गाव, तिरुनेलवेली (जिल्हा) तमिळनाडू
 • मृत्यू : १७ एप्रिल २०२१ चेन्नई

अल्प परिचय

 • लोकप्रिय तमिळ विनोदी अभिनेते विवेक यांचे हृदयाच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
 • ते ५९ वर्षांचे होते.
 • विवेक हे अभिनेता तर होतेच त्याचबरोबर पटकथा लेखक, आणि गायकही होते.
 • ते महाविद्यालयीन शिक्षण घेताना विविध प्रकारच्या अतिरिक्त अभ्यासक्रमात भाग घ्यायचे.
 • पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी तमिळनाडू सरकारमध्ये सचिव म्हणून काम केले. त्यासोबतच ह्यूमर क्लबमध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून काम केले होते.
 • ह्यूमर क्लबचे संस्थापक पीआर गोंविदराजन यांनी विवेक यांची ओळख भारतीय चित्रपट दिग्दर्शक के. बालाचंदर यांच्याशी केली. त्यामुळे विवेक यांना चित्रपटात पटकथा लेखक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
 • १९८७ मध्ये ते “मानयिल उरुथी वेदुम” या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले व अभिनेत्री सुहासिनीच्या भावाची भूमिका साकारली.
 • ते एक हरित पर्यावरणीय कार्यकर्ते होते.
 • त्यांनी ६ जून २०१९ रोजी पर्यावरण दिनानिमित्त १०००० झाडे लावली.
 • त्यांनी हिरव्यागार वातावरणाला चालना देण्यासाठी “थुईमाई अरुणाई”ची ‘गो ग्रीन इनिशिएटिव्ह’ ही एक एनजीओ सुरू केली.
 • भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी “ग्रीन ग्लोब प्रॉजेक्ट”, ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध मोहिमेला चालना देण्यासाठी काम केले.
 • त्यांना प्लॅस्टिकमुक्‍त तमिळनाडू या मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते.
 • विवेक यांना “ज्यूनियर कलैवयनर” असेही म्हटले जात असे.
 • विवेक यांचा शेवटचा चित्रपट इंडियन २

पुरस्कार आणि सन्मान

 

क्रमांक कार्यक्रम वर्ष पुरस्कार चित्रपट
१) सत्यभामा विद्यापीठ २०१५ मानद डॉक्टरेट
२) नागरी सन्मान २००९ पद्मश्री – सिनेमातील योगदान
३) तमिळनाडू राज्य चित्रपट मानद पुरस्कार २००६ कलाविणार पुरस्कार
४) फिल्मफेअर ॲवॉर्ड्‌स दक्षिण २००२

२००३

२००४

सर्वोत्कृष्ट विनोदी तमिळ चालवा

साथ

पेराझागन

५) तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार १९९९

२००२

२००३

२००५

२००७

बेस्ट कॉमेडियन अननरुगे नान इरुंथल

चालवा

पर्थिबन कानबु

अनियान

शिवाजी

६) आंतरराष्ट्रीय तमिळ फिल्म पुरस्कार २००३

२००४

२००८

२०११

बेस्ट कॉमेडियन चालवा

साथ

कुरुवी

वेदी

 

 • एशियनेट फिल्म पुरस्कार २००९ – सर्वोत्कृष्ट विनोदीचा एशियनेट पुरस्कार
 • एडिसन पुरस्कार – २००७ – सर्वोत्कृष्ट विनोदी – सिनेमा – गुरु एन आलु

Contact Us

  Enquire Now