विधानसभा निवडणूक
चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल
- पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात माजी मुख्य निवडणुक आयुक्त सुनिल अरोरा यांनी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली.
- वरील सर्व विधानसभा निवडणुकांचा निकाल २ मे २०२१ रोजी जाहीर करण्यात आला.
अ) १५ वी आसाम विधानसभा निवडणूक, २०२१
- कालावधी : २७ मार्च ते ६ एप्रिल २०२१
- निवडणूक टप्पे : ३
- नोंदणीकृत मतदार : २,३३,७४,०८७
- एकूण मतदान : ८२.०४%
टप्पा |
जागा |
पहिला |
४७ |
दुसरा |
३९ |
तिसरा |
४० |
एकूण जागा : १२६ (बहुमत – ६४)
पक्षनिहाय जिंकलेल्या जागा :
पक्ष |
जागा |
टक्केवारी |
भाजप |
६० | ३२ |
काँग्रेस |
२९ |
२८.३ |
एजीपी |
९ |
८ |
एआयडीएफ |
१६ |
८.९ |
इतर | १२ |
२२.८ |
- सत्ताधारी भाजप महाआघाडी : ७५ जागा, यात भाजपा, आसाम गण परिषद, युपीपीएल समावेश होतो.
- महाजोत – ५० जागा
- अपक्ष – १ जागा
- आसाममध्ये पहिल्यांदाच सलग दुसऱ्या वेळी बिगर – काँग्रेसी सरकार
सर्बानंद सोनोवाल :
- जन्म – ३१ ऑक्टोबर १९६२
- आसामचे १४ वे मुख्यमंत्री (२०१६ ते २०२१)
- सोनोवाल हे चौदाव्या व सोळाव्या लोकसभेचे सदस्य होते.
- माजी युवक कल्याण व क्रीडामंत्री
- १९९२ ते १९९९ या कालावधीत ऑल इंडिया स्टुडंटस युनियन (आसू) या संघटनेचे अध्यक्ष
ब) १५ वी केरळ विधानसभा निवडणूक, २०२१
- कालावधी : ६ एप्रिल
- निवडणूक टप्पे : १
- एकूण जागा : १४० (बहुमत – ७५)
- एकूण मतदान : ७४.५७%
- पक्षनिहाय जिंकलेल्या जागा
पक्ष |
जागा |
मतांची टक्केवारी |
भाकप |
६२ | २५.३८ |
काँग्रेस |
२१ |
२५.१२ |
भाजप |
० |
११.३० |
मुस्लिम लीग |
१५ |
८.२७ |
इतर | – |
२३.८ |
- डाव्या आघाडीने १४० पैकी ७९ जागा जिंकल्या होत्या, तर २९ जागांवर निर्णायक आघाडी आणि काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने (युडीएफ) ३६ जागा जिंकल्या असून ९ जागांवर आघाडी घेतली होती.
- डाव्या आघाडीच्या सलग दुसऱ्या विजयामुळे कधी काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ), तर कधी एलडीएफ अशी सत्तांतराची गेल्या ४० वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.
पि. विजयन :
- जन्म : २४ मे १९४५
- विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश
- १९९८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळ राज्य सरचिटणीस
- २०१६ निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
- आरोग्य यंत्रणांना सक्षम करून कोरोना साथीचे यशस्वी व्यवस्थापन, सामाजिक सुरक्षा वेतन योजनेतील निधीचे तत्पर वितरण
क) १६ वी तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१
- कालावधी : ६ एप्रिल
- निवडणूक टप्पे : १
- एकूण जागा : २३४ (बहुमत – ११८)
- एकूण मतदान : ७२.८१%
- पक्षनिहाय जिंकलेल्या जागा :
पक्ष |
जागा |
टक्केवारी |
द्रमुक |
१३३ |
३७.३ |
आण्णा द्रमुक |
६६ |
३३.५ |
भाजपा |
४ |
२.८ |
इतर |
३१ |
२६.४ |
- द्रमुकचे करुणानिधी आणि अण्णाद्रमुकच्या जयललिता या नेत्यांच्या निधनानंतर झालेली महत्वपूर्ण निवडणूक.
- अण्णाद्रमुकच्या पराभवामुळे तब्बल दहा वर्षांनंतर तमिळनाडूत सत्तापालट होऊन स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकची सत्ता
- भाजपने अण्णा द्रमुक तर काँग्रेसने द्रमुकबरोबर आघाडी केली होती.
- चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी स्थापन केलेल्या मक्कल निधी मयम पक्षाचाही पराभव.
एम. के. स्टॅलिन :
- जन्म : १ मार्च १९५३
- ६८ वर्षीय स्टॅलिन यांनी उपमुख्यमंत्री, चेन्नईचे महापौरपद आणि करुणानिधी
- सरकारमध्ये ग्रामविकास व स्थानिक प्रशासकीय खाती त्यांनी भूषविली होती.
- व्यक्तीनिहाय तमिळनाडूचे १२ वे मुख्यमंत्री
ड) १७ वी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०२१
- कालावधी : २७ मार्च ते २९ एप्रिल २०२१
- निवडणूक टप्पे : ८
- एकूण जागा : २९४ (बहुमत – १४८)
- एकूण मतदान : ८१.८७%
- पक्षनिहाय जिंकलेल्या जागा :
पक्ष | जागा | मतांची टक्केवारी |
तृणमूल काँग्रेस | २१३ | ४७.९४ |
भाजप | ७७ | ३८.१३ |
भाकप (मार्क्सवादी) | ० | ४.७३ |
काँग्रेस | ० | २.९३ |
- राज्यात विजय मिळवून ममता बॅनर्जीकडे सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता आली आहे.
- या निवडणुकांत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून डावे पक्ष आणि काँग्रेसच्याऐवजी भाजपने मुख्य भूमिका बजावली आहे.
ममता बॅनर्जी
- जन्म : ५ जानेवारी १९५५
- पक्ष : अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
- पश्चिम बंगालच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
- कन्याश्री, स्वास्थ्य साथी हेल्थ कार्ड आणि रुपश्री यांसारख्या कल्याणकारी योजना, बंगालची लेक म्हणून प्रचार, अल्पसंख्यांकांची मते या सर्व गोष्टींचा निवडणुकीत फायदा
- १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना
- पुस्तके : माय अनफरगटेबल मेमोरिज, स्ट्रगल फॉर एक्सिस्टन्स, स्लॉटर ऑफ डेमोक्रेसी
इ) १५ वी पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक, २०२१
- कालावधी : ६ एप्रिल २०२१
- निवडणूक टप्पे : १
- एकूण जागा : ३० (बहुमत – १६)
- एकूण मतदान : ८१.८८%
- पक्षनिहाय जिंकलेल्या जागा :
पक्ष |
जागा |
मतांची टक्केवारी |
रंगस्वामी काँग्रेस |
१० | २५.८५ |
भाजप |
६ |
१३.६६ |
द्रमुक |
६ |
१८.५१ |
काँग्रेस | २ |
१५.७१ |
- माजी मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय एन. रंगास्वामी काँग्रेस पक्षाने पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूकीत भाजपशी युती करून आघाडी घेतली आहे.
एन. रंगास्वामी
- जन्म : ४ ऑगस्ट १९५०
- दुचाकीवरून फिरणारे किंवा लोकांना सहज उपलब्ध होणारे लोकांचे मुख्यमंत्री म्हणून ओळख.
- २००१ ते २००८ या काळात काँग्रेस पक्षातून मुख्यमंत्री.
- २००८ मध्ये मुख्यमंत्री पदावरून दूर केल्यामुळे स्वत:चा स्वतंत्र पक्ष एआयएनआरसीची स्थापना.
- या पक्षातून २०११ ते २०१६ यांनी आता पुन्हा २०२१ मध्ये पुद्दुचेरीचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून निवड
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक
- पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघात सलग तीन वेळा निवडून आलेल्या भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली.
- या पोटनिवडणुकीत ५२४ मतदान केंद्रांवर सरासरी ६६.१५ टक्के मतदान झाले.
- संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातील २२ गावे मिळून हा मतदारसंघ बनतो.
- या निवडणुकीचाही निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर करण्यात आला.
- महाविकास आघाडीचे भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भाजपचे समाधान अवताडे यांत चुरशीची लढत
- समाधान अवताडे यांच्या विजयाने भाजप चिन्हावरील उमेदवार येथून प्रथमच विजयी झाला आहे.
परिक्षाभिमुख माहिती :
- राज्यघटनेच्या भाग ६, प्रकरण – ३ व कलम १६८ ते २१२ मध्ये राज्य विधीमंडळाबाबत तरतुदी नमूद केल्या आहेत.
- देशात, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांत द्विगृही विधीमंडळ आहे.
विधानसभा :
- राज्य विधीमंडळाचे कनिष्ठ सभागृह असून याचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
सदस्यत्वासाठी पात्रता :
अ) ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
ब) वयाची २५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
क) त्याचे नाव राज्यातील कोणत्यातरी मतदार संघांच्या मतदार यादीत नमूद असावे
रचना :
- राज्याच्या लोकसंख्येनुसार कमीत कमी ६० व जास्तीत जास्त ५०० सभासद
अपवाद :
अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा | ३० |
मिझोरम | ४० |
नागालँड | ४६ |
- संसद व राज्य विधीमंडळाच्या निवडणुकांची जबाबदारी घटनेतील कलम ३२४ नुसार राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे.
- सुशील चंद्र हे भारताचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त.