लोकसभेच्या उपसभापतीचे पद अजूनही रिक्तच

लोकसभेच्या उपसभापतीचे पद अजूनही रिक्तच

  • गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेच्या उपसभापतीचे पद रिक्त आहे.
  • दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उपसभापती पदाची निवडणूक न घेण्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • अजूनही रिक्तच ठेवलेले उपसभापती हे पद घटनेतील कलम ९३ चे उल्लंघन मानले जाते.

उपसभापती पदाविषयी :

  • घटनेतील कलम ९३ नुसार लोकसभेच्या सभापती व उपसभापतींची निवड केली जाते.
  • सभापतीची निवडणूक झाल्यानंतर तो उपसभापतीच्या निवडणुकीचा दिनांक ठरवितो.
  • अकराव्या लोकसभेपासून सभापती सत्तारूढ पक्षाचा आणि उपसभापती मुख्य विरोधी पक्षाचा असावा यावर सहमती झाली आहे.
  • भारतात सभापती आणि उपसभापती ही पदे १९२१ मध्ये भारत सरकार कायदा, १९१९ मधील तरतुदींनुसार अस्तित्वात आली. त्यावेळी त्यांना अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष असे संबोधले जात.
  • अग्रक्रम तालिकेनुसार उपसभापतीचा दहावा क्रमांक आहे.

 

उपसभापतीचे अधिकार:

 

१) सभापती अनुपस्थित असल्यास उपसभापती लोकसभेच्या बैठकांचे तसेच दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकींचे अध्यक्षस्थान भूषवितात. अशा वेळी समान मत विभागणी झाल्यास त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार प्राप्त होतो.

२) उपसभापती सभापतीपेक्षा दुय्यम नसून गृहाला थेट उत्तरदायी असतात.

  • वेतन व भत्ते : भारताच्या संचित निधीतून दिले जाते.
  • पदावधी : उपसभापती, सभापती प्रमाणेच सामान्यत: लोकसभेच्या कार्यकालापर्यंत पदावर असतो.
  • पदच्युती : खालील तीनपैकी कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आपले पद सोडू शकतो.

अ) तो लोकसभेचा सदस्य राहिला नाही तर;

ब) जर त्याने सभापतीला लिखित राजीनामा दिला तर;

क) जर त्याला १४ दिवसांची पूर्वसूचना देऊन लोकसभेच्या सर्व सदस्यसंख्येच्या बहुमताने ठराव करून पदावरून दूर केले तर.

लोकसभेच्या प्रमुखांचा गट:

  • लोकसभेच्या नियमांनुसार सभापती सदस्यांपैकी कमाल १० जणांचा लोकसभेचा प्रमुख असा गट नामनिर्देशित करतो.
  • यापैकी कोणीही एक सभापती किंवा उपसभापतींच्या अनुपस्थितीत गृहाच्या अध्यक्षपदी असतो.
  • मात्र ज्यावेळी सभापती किंवा उपसभापती हे पद रिक्त असेल त्यावेळी गटातील सदस्य लोकसभेचा प्रमुख असू शकत नाही.

 

उपसभापती निवडीस विलंब झाल्याची कारणे:

 

१) पसंतीच्या उमेदवारास निवडून देण्याची विरोधी पक्षांची अक्षमता.

२) केंद्र सरकारची उमेदवाराला या पदावर नेमण्याची उदासीन वृत्ती.

 

लोकसभेच्या पदाधिकाऱ्यांसंबंधित कलमे:

 

कलम तरतूद
९३ लोकसभेचे सभापती व उपसभापती
९४ सभापती व उपसभापती यांची पदे रिक्त होणे, राजीनामा व पदच्युती
९५ सभापती म्हणून किंवा पदाची कार्ये पार पाडण्याचा उपसभापतीचा किंवा इतर व्यक्तीचा अधिकार
९६ पदच्युतीचा ठराव विचाराधीन असताना सभापती किंवा उपसभापती गृहाच्या अध्यक्षपदी असणार नाहीत.
९७ वेतन व भत्ते
९८ संसदेचे सचिवालय

Contact Us

    Enquire Now