लॉव्रे संग्रहालयाच्या पहिल्या महिला अध्यक्ष : लॉरेन्स डेस कार्स

लॉव्रे संग्रहालयाच्या पहिल्या महिला अध्यक्ष : लॉरेन्स डेस कार्स 

 • कला इतिहासकार आणि संग्रहालयाचे अधीक्षक (क्युरेटर) लॉरेन्स डेस कार्स या लॉव्रे कला संग्रहालयाच्या 228 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्‍त झाल्या आहेत.  

लॉरेन्स डेस कार्स

 • लॉरेन्स डेस कार्स यांनी 1994 मध्ये म्युझियम डी ऑरसे या पॅरिसमधील नावाजलेले संग्रहालयात क्युरेटर म्हणून काम केले आणि 2017 मध्ये त्याच्या पहिल्या महिला दिग्दर्शक म्हणून नियुक्‍त झाल्या.

सन्मान 

 • लीजन ऑफ ऑनर
 • नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट
 • ऑफिसर ऑफ आर्ट ॲण्ड लेटर्स

लॉव्रे संग्रहालय

 • जगातील सर्वात मोठे व सर्वाधिक भेट दिले जाणारे कला संग्रहालय
 • पॅरिसस्थित ऐतिहासिक स्मारक
 • स्थापना – 1793 (सीन नदीच्या काठावर)
 • फिलिप – II च्या काळात 12व्या शतकाच्या उत्तरार्धात लॉव्रे पॅलेसमध्ये हे संग्रहालय बांधण्यात आले हाेते.
 • फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी नॅशनल असेंब्लीने असा आदेश दिला की, लॉव्रेचा उपयोग देशाचा उत्कृष्ट नमुना प्रदर्शित करण्यासाठी संग्रहालय म्हणून वापर करावा.
 • यासाठी 10 ऑगस्ट 1793 मध्ये 537 चित्रांच्या प्रदर्शनासह हे संग्रहालय खुले करण्यात आले.
 • लिओनार्डो द विंचीच्या उत्कृष्ट कलेचा नमुना म्हणजेच मोनालिसाचे चित्र या वास्तूत आहे.

येथील संग्रहालयाचे आठ क्युरेटोरियल विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे.

 1. इजिप्शियन पुरातन वास्तू 
 2. पुरातन प्राचीन वास्तू
 3. ग्रीक, एट्रस्कॅन आणि रोमन प्राचीन वास्तू
 4. इस्लामिक कला
 5. शिल्पकला
 6. सजावटीच्या कला
 7. चित्रे
 8. रेखाचित्रे

Contact Us

  Enquire Now