लसीकरण गतिमान करण्याची गरज

लसीकरण गतिमान करण्याची गरज

  • कोरोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले.
  • केंद्र सरकारने लसीकरणाचा आकडा यापेक्षा लोकसंख्येच्या किती टक्के नागरिकांचे लसीकरण झाले यावर लक्ष द्यावे अशी सूचना देखील त्यांनी केली.
  • पंचेचाळीस वयाच्या खाली असले तरी त्याला लसीकरण करायचे की नाही, तसेच लसीकरणासाठी श्रेणी ठरविण्याचा राज्यांना अधिकार द्यावा अशी सूचना त्यांनी पत्राद्वारे केली.
  • आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी केंद्राकडे 10 टक्के साठा राखून ठेवावा, असेही डॉ. सिंग म्हटले.

कोरोना लढ्यासाठी पंचसूत्री 

  1. पुढील सहा महिन्यांचा विचार करून लस उत्पादकांकडे मागणी नोंदवावी.
  2. लसींचा पुरवठा कसा करणार, याचे सूत्र पारदर्शीपणे सांगावे.
  3. लस कोणाला द्यायची, याचा अधिकार राज्यांना द्यावा.
  4. लस निर्मात्यांना प्रकल्प विस्तारासाठी परवानगी आणि मदत द्यावी.
  5. लसींची आयात केली जावी.
  • गेल्या काही दिवसांत भारत हा जगातील मोठा लसउत्पादक देश बनला आहे.
  • लस बनविण्याची क्षमता विशेष करून खासगी क्षेत्रांमध्ये आहे.
  • सध्याच्या आपत्तीचा काळ लक्षात घेऊन लस निर्मात्यांना त्यांच्या उत्पादन प्रकल्पांचा तातडीने विस्तार करण्यासाठी आर्थिक आणि अन्य सवलतींच्या रुपाने मदत पुरविली पाहिजे.
  • सध्या कायद्यात असलेली परवान्याची सक्ती उठवणे गरजेचे आहे. जेणेकरून अधिकाधिक कंपन्या लस उत्पादन करू शकतील.

भारतातील लसीकरणाचे टप्पे (1 मे 2021 पर्यंत)

टप्पे दिनांक लाभार्थी
पहिला 16 जानेवारी 2021 पासून सुरू आरोग्य कर्मचारी
दुसरा फ्रंटलाईन वर्कर्स
तिसरा 1 मार्च 2021 पासून सुरू 45 वर्षांपुढील सर्व नागरिक
चौथा 1 मे 2021 पासून सुरू  18 वर्षांवरील सर्व नागरिक

 

Contact Us

    Enquire Now